महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देश-विदेशात ‘रोड शो’ मध्ये सहभागी होणार पर्यटन खाते

06:51 AM Dec 26, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

नववर्षापासून देशाच्या विविध शहरात होणाऱया ‘रोड शो’मध्ये गोवा पर्यटन खातेही सहभाग घेणार आहे. देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने खात्यातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

त्यानुसार दि. 21 ते 23 जानेवारी दरम्यान चेन्नई ट्रव्हल अँड टुरिझम फेअर आणि दि. 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान बेंगळुरू, तसेच दि. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे दक्षिण आशिया ट्रव्हल अँड टुरिझम एक्झिबिशनमध्ये सहभाग घेणार आहे. दि. 11 ते 13 मार्च दरम्यान इंडिया ट्रव्हल मार्ट अमृतसर आणि दि. 25 ते 27 मार्च दरम्यान वाराणसी येथे हॉलिडे एक्स्पो होणार असून त्यातही पर्यटन खाते सहभाग घेणार आहे. वाराणसी येथील हॉलिडे एक्स्पोमध्ये गोवा पर्यटन खाते प्रथमच सहभागी होणार आहे.

गेल्या आठवडय़ात हैदराबाद तसेच जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ’द इंडिया इंटरनॅशनल ट्रव्हल मार्ट’ मध्ये गोवा टुरिझमने याआधीच भाग घेतला होता. राज्यातील पर्यटनाला चालना देणे आणि सर्व भागधारकांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने दोन्ही रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.

जानेवारी 2022 मध्ये स्पेनमध्ये होणारे इंटरनॅशनल ट्रव्हल अँड टुरिझम एक्झिबिशन तसेच आयटीबी बर्लिन जर्मनी, बीटीएल पोर्तुगाल आणि मार्चमध्ये मॉस्को येथे होणाऱया मॉस्को इंटरनॅशनल ट्रव्हल टुरिझम एक्झिबिशन व पर्यटन मेळाव्यांमध्येही गोवा पर्यटन सहभागी होण्याची शक्मयता आहे.

दरम्यान, 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणारा बिझनेस लेझर ट्रव्हल माईस रद्द करण्यात आला असल्याचे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article