दीपिकाच्या वेटलॉस टीप्स
06:00 AM Apr 14, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
‘दिया और बाती हम’ या मालिकेमुळे दीपिका सिंहला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र बाळंतपणानंतर दीपिकाचं वजन बरंच वाढलं होतं. पण यामुळे निराश न होता दीपिकाने हे वाढलेलं वजन प्रयत्नपूर्वक कमी केलं. आई झाल्यानंतर दीपिकाचं वजन 73 किलो झालं होतं. मग तिने पोषक आहार, नियमित व्यायाम आणि योगासनं करून ते 52 किलोवर आणलं. वजन कमी करण्यासाठी दीपिकाने दिलेल्या या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
Advertisement
- कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी तुमच्याकडे सबळ कारण किंवा प्रेरणा असायला हवी, असे दीपिका सांगते. वजन वाढल्यानंतर दीपिकाला आधीचे कपडे होत नव्हते. हे कपडे घालण्यासाठी तिला बारीक व्हायचं होतं. जुने कपडे बघितल्यावर तिला वजन कमी करण्याची प्रेरणा मिळायची. तसंच तिने आपले जुने फोटो मोबाईल वॉलपेपर म्हणून लावले होते. तसंच खोलीतही बारीक असतानाचे फोटो लावले होते. हे फोटो बघून तिला वजन कमी करण्याची प्रेरणा मिळत गेली.
- कधीही घाईघाईत जेवू नये, असं दीपिका सांगते. शांतपणे आणि चावून चावून अन्न खाल्ल्याने ते नीट पचतं तसंच वजन कमी व्हायला मदत होते. प्रत्येकाने जेवणासाठी किमान 15 मिनिटं तरी द्यायला हवीत, असं तिचं म्हणणं आहे. तसंच खाताना टीव्ही, मोबाईल बघणं असे प्रकार करू नयेत, असंही ती सांगते.
- गरोदरपणानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. पोषक घटकांची कमतरता जाणवू शकते. हे टाळण्यासाठी शारीरिक तपासणी करून घेऊन आवश्यक ती जीवनसत्त्वं सप्लिमेंटच्या रुपात घ्यायला हवीत. शरीरातली कमतरता भरून काढल्यानंतर वजन कमी करण्याचा विचार करावा, असं दीपिका सांगते.
- मेडिटेशनच्या माध्यमातूनही वजन कमी करता येतं, असं ती सांगते. आपल्याला वजन का कमी करायचं आहे हे आधी स्वतःला समजावून सांगा. याकामी मेडिटेशन तुमची मदत करू शकतं.
- वजन कमी करण्याचे सल्ले देणारी पुस्तकं उपयुक्त ठरू शकतात, असं दीपिकाचं म्हणणं आहे.
- सकाळी लवकर उठून व्यायाम, योगा तसंच प्राणायाम केल्यानेही वजन कमी व्हायला मदत होते, असं ती सांगते.
Advertisement
Advertisement
Next Article