कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली-राजस्थान यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित

06:45 AM Sep 25, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयपीएल साखळी सामना - दिल्ली पुन्हा अव्वलस्थान काबीज करण्यासाठी प्रयत्नशील, दोन्ही आघाडय़ांवर संघ उत्तम बहरात

Advertisement

अबु धाबी / वृत्तसंस्था

Advertisement

उत्तम समन्वयाने खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज (शनिवार दि. 25) दिवसभरातील पहिल्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढणार असून गुणतालिकेतील अव्वलस्थान पुन्हा काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने आयपीएल हंगामातील पहिल्या टप्प्यात सनसनाटी कामगिरी साकारत 8 पैकी 6 सामने जिंकले. त्यांनी या दुसऱया टप्प्यात बुधवारी सनरायजर्स हैदराबादचा 8 गडी राखून धुव्वा उडवत येथेही उत्तम सुरुवात केली.

दुसरीकडे, प्रारंभिक टप्प्यात बराच झगडलेला राजस्थानचा संघ पंजाब किंग्सविरुद्ध शेवटच्या क्षणी 2 धावांनी निसटता विजय संपादन केला असल्याने आणखी आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. त्या विजयासह राजस्थानने प्ले-ऑफसाठी आपली दावेदारी आणखी भक्कम केली. येथे विजय संपादन केल्यास गुणतालिकेत ते चौथ्या स्थानी पोहोचू शकतील.

राजस्थानसाठी यंगस्टर्स यशस्वी जैस्वाल व महिपाल लोमरोर यांनी पंजाबविरुद्ध उत्तम फटकेबाजी केली. मात्र, संजू सॅमसनला अधिक जबाबदारी घेऊन खेळावे लागेल. गोलंदाजीत कार्तिक त्यागी व बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान यांनी मागील लढतीत स्लॉग ओव्हर्समध्ये उत्तम मारा केला होता.

पंजाबला शेवटच्या 2 षटकात केवळ 8 धावांची गरज असताना मुस्तफिजूरने 19 व्या षटकात अवघ्या 4 धावा दिल्या तर त्यानंतर नवोदित त्यागीने एकच धाव देत 2 बळी घेतले आणि हा सामना जिंकून देण्याचा पराक्रम गाजवला होता. अर्थात, आज राजस्थानसमोरील आव्हान आणखी कडवे असू शकते. सलामीवीर शिखर धवन (422) व पृथ्वी शॉ (319 धावा) उत्तम बहरात असल्याने राजस्थानसाठी कडव्या आव्हानाची तेथूनच सुरुवात होईल.

धवन-शॉ धोकादायक

धवन व शॉ यांनी आतापर्यंत 6 वेळा अर्धशतकी भागीदारी साकारली असून एकत्रित 88 चौकार व 21 षटकारही फटकावले आहेत. कोणत्याही गोलंदाजी आघाडीसाठी या उभयतांचा सामना करणे आव्हानात्मकच ठरत आले आहे.

पहिल्या टप्प्यात दुखापतग्रस्त असल्याने खेळू न शकलेल्या श्रेयस अय्यरने येथे नाबाद 47 धावांची दमदार भागीदारी साकारत उत्तम पुनरागमन नोंदवले. दिल्ली कॅपिटल्सची मध्यफळी देखील मजबूत असून रिषभ पंत (248 धावा), ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ व शिमरॉन हेतमेयर सूर सापडल्यास कोणत्याही गोलंदाजाचा अक्षरशः धुव्वा उडवू शकतात. गोलंदाजीत दिल्लीचा संघ बदल करण्याची फारशी शक्यता नाही. अवेश खान प्रभावी ठरला आहे तर दक्षिण आफ्रिकन कॅगिसो रबाडा प्रारंभीच धक्के देऊ शकतो. ऍनरिच नोर्त्झेने देखील आपला एक्स्प्रेस स्पीड यापूर्वी दाखवून दिला आहे.

संभाव्य संघ

दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉन हेतमेयर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, ऍनरिच नोर्त्झे, अवेश खान, बेन ड्वॉर्शुईस, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरिवाला, प्रवीण दुबे, टॉम करण, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोईनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्ज, विष्णू विनोद.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, इव्हिन लुईस, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, ओशेन थॉमस, मुस्तफिजूर रहमान, तबरेज शमसी, ग्लेन फिलीप्स, चेतन साकरिया, रियान पराग, राहुल तेवातिया, आकाश सिंग, अनुज रावत, केसी करिअप्पा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयांक मार्कंडे, जयदेव उनादकट, कुलदीप यादव, महिपाल लोमरोर.

सामन्याची वेळ- दुपारी 3.30 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article