दर 20 वर्षांनी नष्ट केले जाणारे मंदिर
पुन्हा नव्याने होते उभारणी
जगभरात विविध प्रकारचे धर्म आहेत, या धर्माशी निगडित स्वत:च्या मान्यता देखील आहेत. या मान्यतांचे पालन तेथील लोक स्वत:च्या जीवनात करत असतात. अनेकदा तर अनेक प्रथा समजण्यापलिकडच्या असतात, परंतु एका खास ठिकाणच्या लोकांसाठी या प्रथा धार्मिक श्रद्धेचा भाग असतात.
एक धार्मिक स्थळ दर 20 वर्षांनी नष्ट केले जाते आणि पुन्हा निर्माण केले जाते. एक मंदिराला भाविकच पाडत असतात आणि ते पुन्हा उभारत असतात. या ठिकाणाचे नाव ईस ग्रँड श्राइन असे नाव असून त्याला जिंगू या नावाने देखील ओळखले जाते. हे जपानच्या सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे.
हे मंदिर दोन हिस्स्यांमध्ये विभागलेले आहे. नाइकु म्हणजेच अंतर्गत मठ आणि गेकू म्हणजेच बाहेरील मठ असे याचे दोन हिस्से ओत. या मठांचे वैशिष्ट्या म्हणजे त्यांना उजी पुलासोबत दर 20 वर्षांनी तोडले जाते आणि पुन्हा निर्माण केले जाते. ही परंपरा मागील 1300 वर्षांपासून चालत आली आहे. ही परंपरा शिंतो प्रथेशी निगडित आहे. याला मृत्यू आणि पुनर्जन्माशी जोडून पाहिले जाते. याच्या माध्यमातून एका पिढीतून मठ निर्माण करण्याची कला दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचत असते. मठाला अत्यंत नजीकच निर्माण करण्यात आलेल्या जागी पुन्हा निर्माण करण्यात येते. हा मठ जुना होताच पुन्हा नजीकच्या ठिकाणी निर्मिती करण्यात येते.
येथील मठ यापूर्वी 2013 मध्ये निर्माण करण्यात आला होता आणि हा प्रकार 62 व्यांदा करण्यात आला होता. आता 2033 मध्ये या परंपरेचे पालन केले जाणार आहे. या घटनेला खास ठरविण्यासाठी विशेष सण साजरा करण्यात येतो. याला ओकिहिकी फेस्टिव्हल म्हटले जाते. यादरम्यान लोक सायप्रसच्या वृक्षांच्या मोठमोठ्या लाकडांना जमवितात, याच्याचद्वारे नवा मठ तयार केला जातो.