For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तृणमूल काँग्रेसककडुन चार उमेदवारांची घोषणा

06:31 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
तृणमूल काँग्रेसककडुन चार उमेदवारांची घोषणा
Advertisement

आसाममध्ये  पक्ष उभे करणार उमेदवार/ वृत्तसंस्था

Advertisement

गुवाहाटी

देशात सध्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांच्या एकजुटीला झटका देत तृणमूल काँग्रेसने आसाममधील चार लोकसभा मतदारसंघांसाठी स्वत:च्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत तृणमूल काँग्रेसकडुन उमेदवार जाहीर करण्यात आल्याने काँग्रेसला  फटका बसणार आहे.

Advertisement

तृणमूलने कोक्राझार (अनुसूचित जमातीसाठी राखीव), बारपेटा, लखीमपूर आणि सिल्चर (अनुसूचित जातीसाठी राखीव) मतदारसंघातील स्वत:च्या उमेदवारांची यादी जारी केली आहे. पक्षाने कोक्राझारमध्ये गौरीशंकर सरानिया, बारपेटामध्sय अबुल कलाम आझाद, लखीमपूरमध्ये घाना कांता चुटिया आणि सिल्चरमध्ये राधाश्याम विश्वास यांना उमेदवारी दिली आहे.

तृणमूल काँग्रेस हा युनायटेड अपोझिशन फोरम आसामचा (युओएफए) हिस्सा आहे. ही 16 पक्षांची एक आघाडी आहे. यापूर्वी र्कांग्रेसने आसाममधील 12 उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून लखीमपूर मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बारपेटा मतदारसंघाकरता आमदार मनोरंजन तालुकदार यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसने यापूर्वीच स्वत:चा उमेदवार जाहीर केला आहे

Advertisement
Tags :

.