टाटा विस्ट्रॉनचा आयफोन प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी सज्ज
समूह प्रकल्पामध्ये आयफोन 15 ची निर्मिती होणार असल्याची माहिती
नवी दिल्ली :
देशातील दिग्गज कंपनी टाटा समूह एप्रिल महिन्याच्या अखेरीस विस्ट्रॉनच्या बेंगळुरू येथील आयफोन प्रकल्पाचे अधिग्रहण पूर्ण करू शकणार असल्याचे संकेत आहेत. सदरची माहिती बिझनेस लाइन यांच्या अहवालावऊन देण्यात आली आहे. यामध्ये टाटा समूह विस्ट्रॉनचा ताबा घेतल्यानंतर, भारताला अॅपलचे पहिले स्वदेशी उत्पादन मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती आहे.
टाटा समूहाने प्रकल्पामध्ये संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये प्राप्त अहवालानुसार, संपादन प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे 2,000 कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पातून सुमारे 400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते.
प्रकल्पामध्ये आयफोन-15 ची निर्मिती
असा अंदाज आहे की अधिग्रहणानंतर, भारतीय समूह प्रकल्पामध्ये आयफोन-15 चे उत्पादन सुरू कऊ शकते. सध्या विस्ट्रॉनचा भारतीय प्रकल्प असून यात आयफोन-12 आणि आयफोन-14 ची निर्मिती होत आहे. टाटाच्या अधिग्रहणानंतर, विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल, कारण अॅपल उत्पादनांसाठी कंपनीचा हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे.
अॅपल उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अंदाजे 600 दशलक्ष डॉलर इतकी आहे. हे अधिग्रहण अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास टाटाकडून व्यक्त केला जात आहे. अॅपलची नजर उत्पादनासाठी भारताकडे लागून राहिली आहे. कारण, अॅपलला चीनमधून बाहेर पडून अन्यत्र स्थिर व्हायचे आहे. त्यासाठी भारतीय बाजारपेठ महत्त्वाची मानली जात आहे.
तैवानच्या तीन कंपन्यांपैकी एक
तैवानच्या तीन कंपन्यांपैकी फक्त विस्ट्रॉन भारत सोडत आहे.गेल्या वर्षी, क्यूपर्टिनो, कॅलिफोर्नियास्थित कंपनीने चीन आणि अमेरिका यांच्यातील वादामुळे जगभरातील सुमारे 25टक्के उत्पादन भारतात हलवण्याचे जाहीर केले होते. अॅपल उत्पादने असेंबल करणाऱ्या तीन तैवान कंपन्यांपैकी फक्त विस्ट्रॉन भारत सोडत आहे. दरम्यान, फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनने भारतात त्यांच्या उत्पादन प्रक्रियेचा विस्तार केलेला आहे.