महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जपानमध्ये भूकंपात 5 ठार, 125 जखमी

07:00 AM Mar 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बुलेट टेन रुळावरून घसरली

Advertisement

टोकियो / वृत्तसंस्था

Advertisement

जपानमध्ये बुधवारी रात्री झालेल्या भूकंपात पाच जणांचा मृत्यू झाला असून 125 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जपानच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 11ः36 वाजता या भूकंपाचा प्रभाव राजधानी टोकियोसह अनेक शहरांमध्ये दिसून आला. या भूकंपानंतर प्रशासकीय यंत्रणेने विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. सुमारे 20 लाख घरांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. भूकंपामुळे बुलेट टेन रुळावरून घसरण्याची दुर्घटना घडली होती. मात्र, यात मोठी जीवितहानी झालेली नाही.

जपानमधील भूकंपाचा राजधानी टोकियोसह अनेक शहरांमध्ये परिणाम दिसून आला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जोरदार धक्क्यांमुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू फुकुशिमा परिसरात सुमारे 60 किमी खोलवर होता. जपानच्या ईशान्य किनारपट्टी भागात ही घटना घडल्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.  सरकारकडून एकंदर परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे.

आता धक्के जाणवलेल्या भागामध्येच 2011 मध्ये मोठा भूकंप झाल्यानंतर त्सुनामी आली होती. त्या दुर्घटनेत फुकुशिमा आण्विक आपत्ती घडली. त्यानंतर आलेल्या त्सुनामीत 18 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे पाच लाख लोक बेघर झाले. या दुर्घटनेला 10 वर्षे उलटल्यानंतरही फुकुशिमाच्या आसपासचे हजारो लोक अजूनही आपल्या घरी परतू शकलेले नाहीत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article