छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा ‘न्याय’
वृत्तसंस्था/ रायपूर :
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीच्या दिनी छत्तीसगड सरकारने त्यांच्या नावावर शेतकऱयांसाठी एक नवी योजना सुरू केली आहे. राजीव गांधी किसान न्याय योजना असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी योजनेचा शुभारंभ केला आहे. सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सामील झाल्या.
राजीव गांधी किसान न्याय योजनेची सुरुवात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात झाली आहे. योजनेद्वारे ऊस आणि मका उत्पादक शेतकऱयांच्या खात्यात थेट 7500 रुपये जमा होणार आहेत. पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात गुरुवारी 1500 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
योजनेत धान्य पिकासाठी 18 लाख 34 हजार 834 शेतकऱयांना 1500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱयांना लाभ होणार असल्याचे बघेल यांनी म्हटले आहे.