घराबाहेर देव्हारा, झाडाखाली आसरा!
देवतांच्या प्रतिमांबरोबरच देव्हाऱयालाही बाहेरचा रस्ता
प्रतिनिधी /बेळगाव
कुटुंबांतील ज्ये÷ांची अडगळ झाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे त्यांना वृद्धाश्रमात पाठविले जाते. हे एकवेळ समजून घेता येईल. परंतु आपल्या घरातील देवाच्या मूर्ती शहरात ठिकठिकाणी असणाऱया झाडांखाली ठेवल्या जातात. सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ त्याचे संकलनही करतात.
मात्र, आता घरातील देव्हाऱयांचीसुद्धा लोकांना अडचण होऊ लागल्याने देव्हारेही झाडाखाली सोडून देण्यात येत आहेत, ही खेदजनक बाब आहे. टिळकवाडी व्हॅक्सिन डेपो येथील एका झाडाखाली असाच एक देव्हारा ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी देवांच्या प्रतिमा, फोटो नेहमीच आणून ठेवले जातात. मात्र, मंगळवारी सकाळी चक्क देव्हारा ठेवलेला आढळल्याने सकाळी फिरावयास गेलेल्या लोकांमध्ये व परिसरात याची चर्चा सुरू होती.
एकीकडे हा प्रकार असताना देवदेवतांच्या प्रतिमा सोडून देण्यासाठी सरकारी कार्यालयेसुद्धा वेठीस धरण्यात आली आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील उपनोंदणी कार्यालयाच्या परिसरातील झाडाच्या ठिकाणीसुद्धा देवांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत, हे खरोखरच दुर्दैवी होय. येथील भिंती पिचकाऱयांनी रंगल्या आहेत आणि दुसरीकडे देवांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. ही विसंगती कोण दूर करणार, हा प्रश्न आहे.