गुगलकडून ऑस्ट्रेलियालासर्च इंजिन बंद करण्याची धमकी
कॅनबरा
अमेरिकेची दिग्गज कंपनी गुगलने ऑस्ट्रेलियाला सर्च इंजिन बंद करण्याची धमकी दिली आहे. कारण न्यूजसाठी स्थानिक पब्लिशर्सला पैसा देण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याने आपले सर्च इंजिन बंद करणार असल्याची धमकी दिली आहे. गुगल आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यात बातम्यांच्या बदल्यात पैसे देण्यासह अन्य विवाद सुरु आहे. यामुळे हा वाद भडका असल्याची माहिती आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पतंप्रधान स्कॉट मॉरिशन हे पैसे देण्यासाठी कायदा तयार करण्यासाठी दृढ असून त्यांनी धमक्यांना कोणतेही उत्तर दिलेले नाही. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिनसाठी पैसे देण्याचा प्रकार धक्कादायक असल्याची बाब समोर आली आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलियामध्ये 94 टक्के सर्च गुगलवरती केले जाते. यामुळे या विवादाचे पडसाद आगामी काळात कोणत्या टप्प्यावर पोहोचणार हा अंदाज आताच बांधणे कठीण असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. या कायद्याला फेसबुकचाही विरोध होत आहे. कारण असे झाले तर ऑस्ट्रेलियाला न्यूज पोस्ट करण्यावर बंदी घालण्यावर विचार कारावा लागेल असेही स्पष्ट केले आहे.