For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गालांचा सुंदर्यासाठी ...

06:00 AM Nov 11, 2021 IST | Tarun Bharat Portal
गालांचा सुंदर्यासाठी

फॅशन... मेकअप... हेअरस्टाईल ही आजकाल महिलांच्या लाईफस्टाईलमधील महत्वाची बाब झाली आहे. रोजच्या रोज नीटनेटके दिसावे. व्यक्तिमत्व उठावदार असावे, असे प्रत्येकीलाच वाटत असते. त्यासाठी कॉलेजस्टुडंटच नव्हे तर हाऊसवाईफ, नोकरदार स्त्रिया या दक्ष असतातच. आपल्या घरची जबाबदारी सांभाळून स्वतःला फिट आणि सुंदर ठेवणे यात काहीजणी अगदी वाक्बगार असतात.

Advertisement

  • सौंदर्याराधनेत चिकबोनलाही डोळे, ओठ, दातांइतके महत्व आहे. 
  • सर्वांचेच चिकबोन जन्मापासूनच सुंदर असतात असे नाही. पण काही उपाय करुन ते सुंदर बनवता येतात.
  • चेहर्यावर ब्लशरचा वापर करुन त्यांच्यात उभार आणू शकतो. जे शेड योग्य असेल त्याचाच वापर केला पाहिजे. जास्त डार्क किंवा जास्त लाईट शेडवापरणे टाळावे. हे नेहमी मिडीयम शेडचेच असले पाहिजे.
  • ज्यांची त्वचा पेल असेल त्यांनी ब्रॉजर वापरायला हरकत नाही. पण त्यासाठी फक्त शेड सिलेक्ट करुन चालणार नाही.त्याला व्यवस्थितरित्या लावतासुद्धा आले पाहिजे.
  • गालाच्या शेवटी आणि डोळय़ाच्या सुरुवातीला  शिमरी ब्लशचा वापर करावा. याने चेहरा हायलाईट होईल आणि गाल सुंदर दिसतील. गालावर ब्रश व्यवस्थित लावायला पाहिजे.
  • मेकअप प्रॉडक्ट कुठे जास्त किंवा कुठे कमी असे होता कामा नये. ते एकसारखेच असणे गरजेचे होते. अन्यथा गाल सुंदर दिसण्याऐवजी चित्रविचित्र दिसून आपले हसे होईल. परंतु शक्य असेल तोपर्यंत त्याला नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केल्यास सौंदर्यात आणखीनच भर पडते.
Advertisement
Tags :
×

.