For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांधींच्या सभेत पोस्टरवर भाजप मंत्री

06:23 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
गांधींच्या सभेत पोस्टरवर भाजप मंत्री
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मध्यप्रदेशात मांडला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधीच्या प्रचारसभेत लावलेल्या पोस्टर्सवर भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याचे चित्र पहावयास मिळाल्याने उपस्थितांसाठी तो मोठाच करमणुकीचा विषय ठरुन त्यावर बरीच चर्चा होत आहे. काँग्रेसने ही ‘मानवी चूक’ असल्याचे म्हणत सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. पण सोशल मिडियावर या प्रकाराची खिल्ली उडविण्यात येत आहे. मंत्र्यांचे नाव फग्गनसिंग कुलास्ते आहे, अशी माहिती देण्यात आली.

ही बाब लक्षात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्वरित ते पोस्टर आणि होर्डिंग हटविले. पण तोपर्यंत अनेकांनी त्याची आपल्या मोबाईलवर छायाचित्रे काढून घेतली होती. काँग्रेसने मतदानाआधीच आपला पराभव मान्य केला आहे, हे या प्रकारावरुन सिद्ध होते, अशी खोचक प्रतिक्रिया मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मोहन यादव यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

व्यासपीठाच्या दर्शनी बॅनरवरच...

फग्गनसिंग कुलास्ते यांचे मोठे चित्र राहुल गांधी ज्या व्यासपीठावरुन लोकांसमोर भाषण करणार होते, त्या व्यासपीठाच्या दर्शनी पडद्यावरच लावले गेल्याने सभेला आलेल्या प्रत्येकाच्या दृष्टीला पडले. बराच वेळ हा प्रकार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला नाही. तथापि, नंतर काही सजग प्रेक्षकांनी ही बाब कार्यकर्त्यांना दाखवून दिली. त्यामुळे बॅनर हटविण्यात आले. या प्रकारचे व्हिडीओ चित्रणही करण्यात आले असून ते सोशल मिडियावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.