महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गझवा-ए-हिंद’ मॉड्यूलचा एनआयएकडून पर्दाफाश

12:07 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर प्रदेश-गुजरातसह अनेक राज्यांमध्ये छापे, महत्त्वाच्या कागदपत्रांसह डिजिटल उपकरणे जप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाकिस्तान समर्थित ‘गझवा-ए-हिंद’ मॉड्यूल प्रकरणात अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील कारवाईवेळी आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. एनआयएच्या छाप्यात त्या संशयितांचे पाकिस्तानस्थित हस्तकांशी संबंध असल्याची माहितीही उघड झाली आहे. ‘गझवा-ए-हिंद’चे सदर हस्तक भारतविरोधी विचारसरणीचा प्रचार करण्यात गुंतल्याचे झडतीदरम्यान स्पष्ट झाले.

मध्यप्रदेशातील देवास, गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्हा, उत्तर प्रदेशातील आझमगड आणि केरळमधील कोझिकोड येथील संशयितांच्या घरांवर रविवारी छापे टाकण्यात आले. एनआयएच्या कारवाईदरम्यान मोबाईल फोन आणि सिमकार्ड्स व्यतिरिक्त महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

बिहारच्या पाटणा जिह्यात फुलवारीशरीफ पोलिसांनी मरगूब अहमद दानिश उर्फ ताहिरला अटक केल्यानंतर 14 जुलै 2022 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 22 जुलै 2022 पासून एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. झैन नामक पाकिस्तानी नागरिकाने तयार केलेल्या ‘गझवा-ए-हिंद’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचा मरगूब अॅडमिन होता. आरोपी मरगूबने भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आणि येमेन आदी देशांतील अनेक लोकांना या ग्रुपमध्ये जोडले होते. टेलिग्राम आणि बीआयपी मेसेंजरसारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ते सक्रिय होते. भारतात गझवा-ए-हिंद स्थापन करण्याच्या नावाखाली प्रभावशाली तऊणांना कट्टरपंथी बनविण्याच्या उद्देशाने हा व्हॉट्सअॅप ग्रुप पाकिस्तानस्थित संशयितांकडून चालवला जात होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article