कोरोना महामारीने वाढविले महिलांचे संकट
अलिकडेच महिलांवर झालेल्या संशोधनानुसार कोरोना महामारीदरम्यान टाळेबंदीत लाखो महिला आणि युवतींना गर्भनिरोधक औषधे मिळू शकलेली नाहीत. तर गर्भपाताची सुविधा उपलब्ध न झालेल्या महिलांची संख्याही अधिक राहिली आहे.
मेरी स्टॉप्स इंटरनॅशनल जगभरात गर्भपात आणि गर्भनिरोधक (कंट्रासेप्टिव्ह) सेवा उपलब्ध करते. 19 लाख युवतींना या महामारीमुळे गर्भनिरोधक औषधे मिळू शकलेली नाहीत. तर सुरक्षितपद्धतीने गर्भपात करविणेही त्यांच्यासाठीही अवघड ठरल्याचे संस्थेने म्हटले आहे.
यंदाच्या प्रारंभिक काही महिन्यांमध्ये नको असलेल्या गरोदरपणाची सुमारे 9 लाख प्रकरणे समोर आली. यातील बहुतांशी असुरक्षित गर्भपाताची होती. तर 3,100 प्रकरणांमध्ये महिलांचा मृत्यू ओढवल्याचे संस्थेने म्हटले आहे.
दरवर्षी 5 ते 12 टक्के महिला असुरक्षित गर्भपातामुळे स्वतःचा जीव गमावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे. मेरी स्टॉप्स इंटरनॅशनलच्या नव्या संशोधनानुसार भारतात टाळेबंदीदरम्यान 13 लाख महिलांनाही इच्छा नसतानाही मातृत्व पत्करावे लागले आहे. यातील 9 लाख 20 हजार महिलांना सुरक्षित गर्भपाताची सुविधा प्राप्त झाली. तसेच गर्भपातानंतर त्यांची योग्य देखभालही करण्यात आली.
कोरोना विषाणूच्या संकटात महिला आणि युवतींना गर्भनिरोधक औषधांचा दीर्घकाळापर्यंत वापर न करण्याची सूचना संस्थेने केली आहे. आरोग्य कर्मचाऱयांनी टाळेबंदीत महिलांपर्यंत गर्भनिरोधक औषधे पोहोचविण्याचे काम चांगल्याप्रकारे केले आहे. तर 37 देशांमध्ये महिलांना सुरक्षित पद्धतीने गर्भपात करविण्याची सुविधा मिळाल्याचे संस्थेने म्हटले आहे.
मेरी स्टॉप्स इंटरनॅशनलने ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि भारतासह प्रत्येक देशात राहणाऱया 16 ते 50 वयोगटातील 1 हजार महिलांचे सर्वेक्षण केले आहे. ब्रिटनच्या महिलांनुसार कोरोनापूर्वी ज्या महिलांना 81 टक्के गर्भपाताच सुविधा मिळत होती, ती महामारीत 21 टक्क्यांवर आली आहे.
गर्भपाताची गरज असणाऱया महिलांनुसार महामारीदरम्यान ही सुविधा बंद होती. तर 10 पैकी एका महिलेनुसार त्यांना गर्भपात करविण्यासाठी 5 आठवडय़ांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. महामारीदरम्यान गर्भपात आणि गर्भनिरोधक यासारख्या आवश्यक सुविधा कोणत्याही स्थितीत मिळाव्यात असे मेरी स्टॉप इंटरनॅशनलने म्हटले आहे.
इराण : 20 हजार बळी
इराणमध्ये कोरोनाबळींचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. पश्चिम आशियातील कुठल्याही देशात संसर्गाच्या बळींचा हा आकडा सर्वाधिक आहे. वाढत्या महामारीदरम्यान देशात विद्यापीठ प्रवेश परीक्षा घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. या परीक्षेत लाखो विद्यार्थी सामील होणार आहेत. मध्यपूर्वेच्या देशांमध्ये इराणमध्येच सर्वप्रथम बाधित आढळून आले होते. देशात आतापर्यंत 3 लाख 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.
मेक्सिको : 5 लाख रुग्ण
मेक्सिकोत मागील 24 तासांमध्ये 5,792 नवे रुग्ण सापडले असून 707 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील बाधितांचा आकडा 5 लाख 37 हजार 31 झाला आहे. देशात आतापर्यंत 58 हजार 481 जणांना जीव गमवावा लागला आहे. दक्षिण अमेरिका खंडात केवळ ब्राझील आणि पेरूमध्येच मेक्सिकोपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. काही कंपन्यांनी लसीची चाचणी सुरू केल्याचा दावा मेक्सिको सरकारने केला आहे.
ब्राझील रुग्ण वाढले
ब्राझीलमध्ये दिवसभरात 49 हजार 298 नवे रुग्ण सापडले असून 1,212 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील रुग्णसंख्या 34 लाख 60 हजार 413 वर पोहोचली आहे. तर बळींचे प्रमाण 1 लाख 11 हजार 189 झाले आहे. परंतु ब्राझीलच्या आरोग्य विभागानुसार 15 जुलैपासून देशातील कोरोनाबळींचे प्रमाण घटू लागले आहे. तसेच नव्या रुग्णसंख्येतही पूर्वीच्या तुलनेत घट झाली आहे.
अर्जेंटीनात संकट कायम
अर्जेंटीनामध्ये मागील 24 तासांमध्ये 6,693 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 3,12,659 झाली आहे. तर बळींची संख्या 283 ने वाढून 6,630 वर पोहोचली आहे. एका दिवसापूर्वी अर्जेंटीनामध्ये 6,840 नव्या रुग्णासह 235 जणांचा मृत्यू झाला होता.
सोलमध्ये कठोर नियम
दक्षिण कोरियात कोरोनाचा वाढता प्रकोत पाहता राजधनी सोलमध्ये कुठल्याही प्रकारची निदर्शने किंवा मोर्चांसंबंधी कठोर दिशानिर्देश देण्यातआले आहे. रॅली किंवा निदर्शनांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक जणांना सामील होण्याची अनुमती नाही. सरकारकडून जाहीर करण्यात आलेले हे दिशानिर्देश शुक्रवारपासून शहरात लागू होणार आहेत. शहरात सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी दुसरी पातळी लागू करण्यात आली आहे. दिशानिर्देशांचे उल्लंघन करणाऱयावर 3 दशलक्ष वॉन म्हणजेच 1.5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सोलमध्ये दिवसभरात 288 नवे रुग्ण सापडले आहेत.