केसापेक्षाहीलहान वायोलिन
पाहण्यासाठी हवा मायक्रोस्कोप
ब्रिटनच्या लाफबॉरो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोटे वायोलिन तयार केले आहे. हा वायोलिन माणसांच्या केसापेक्षाही पातळ आहे. हा वायोलिन इतका छोटा आहे की तो डोळ्यांनी पाहता येऊ शकत नाही. याला पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज भासते. या वायोलिनला अत्यंत खास तंत्रज्ञान म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने निर्माण करण्यात आले आहे.
ही वायोलिन केवळ 35 मायक्रॉन लांब आणि 13 मायक्रॉफ रुंद आहे. मानवी केसांची जाडी सुमारे 17-180 मायक्रॉन असते. म्हणजेच हा वायोलिन केसांपेक्षाही पातळ आणि छोटा आहे. अत्यंत छोट्या गोष्टीही निर्माण केल्या जाऊ शकतात, हे दाखवून देण्याचा उद्देश वैज्ञानिकांचा होता.
या छोट्या वायोलिनचा आवाज ऐकता येत नाही, कारण तो अत्यंत छोटा आहे. परंतु याचे डिझाइन खऱ्या वायोलिनप्रमाणेच आहे. यात वायोलिनची बॉडी आणि तारा सर्व गोष्टी छोट्या आकारात निर्माण करण्यात आल्या आहेत. वैज्ञानिकांनी या वायोलिनला संशोधन प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण केले आहे. अशाप्रकारे नॅनो तंत्रज्ञानाला विकसित केल्यास भविष्यात याचा वापर शरीरात औषधे पोहोचविणे, छोट्या शस्त्रक्रिया करणे आणि वैद्यकीय यंत्रांना प्रभावी करण्यासाठी केला जाऊ शकतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.