For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल भेटीवेळी भगवंत मान भावूक

12:01 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल भेटीवेळी भगवंत मान भावूक
New Delhi, Apr 15 (ANI): Punjab Chief Minister and Aam Aadmi Party (AAP) leader Bhagwant Mann speaks to the media with party leader Sandeep Pathak outside the Tihar Jail after meeting with Delhi CM and party National Convener Arvind Kejriwal, in New Delhi on Monday. (ANI Photo/Jitender Gupta)
Advertisement

तिहार कारागृहात घेतली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी तिहार कारागृहात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार आणि पंजाबचे सहप्रभारी डॉ. संदीप पाठकही होते. पक्षप्रमुख केजरीवाल यांच्या भेटीवेळी मुख्यमंत्री मान भावूक झाले होते. तसेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मात्र, काही वेळाने त्यांनी स्वत:वर नियंत्रण मिळवत पक्षप्रमुखांशी चर्चा केल्याची माहिती पाठक यांनी दिली. तसेच कारागृहात थेट भेट होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी दर्शवली. द्वयींमधील चर्चेवेळी भिंतीला लावण्यात आलेल्या काचेचा अडथळा येत असल्याचेही सांगण्यात आले.

Advertisement

सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत जोमाने प्रचार करत पक्षाला मोठे यश मिळवून देण्याचे आश्वासन मान यांनी पक्षप्रमुखांना दिले आहे. तसेच पंजाब आणि दिल्लीतील परिस्थितीही केजरीवाल यांनी मान यांच्याकडून जाणून घेतली. पंजाबमध्ये मोफत वीज मिळते की नाही. बाजारात गव्हाची चांगली खरेदी होत आहे की नाही. पाण्यासंबंधी ठोस व्यवस्था आहे की नाही. दिल्लीतील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत आहे का, असे प्रश्नही त्यांनी केले. ‘इंडिया’ आघाडीसोबतच्या आगामी प्रचारसभांच्या नियोजनाची जबाबदारी केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्यावर लादली आहे. तर संदीप पाठक यांच्यावर आमदारांच्या बैठका घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.