For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किणये-पिरनवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवा

07:00 AM Nov 17, 2022 IST | Tarun Bharat Portal
किणये पिरनवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवा
Advertisement

नागरिकांतून मागणी : रस्त्यावर केवळ पॅचवर्कचे सोंगः वाहनधारकांतून तीव्र संताप

Advertisement

वार्ताहर /किणये

किणये ते पिरनवाडी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेलेले आहेत. अनेकवेळा मागणी करूनही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारी या भागातील स्थानिक नागरिकांतून होत आहेत. त्यामुळे आता या रस्त्यासाठी आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Advertisement

बेळगाव-चोर्ला रोडवरील पिरनवाडी ते किणये गावापर्यंतचा टप्पा हा महत्त्वाचा असून या रस्त्यावर गोव्याला ये-जा करणाऱया वाहनांसह परिसरातील विविध गावांमधील वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. मात्र सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखेच आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

किणये रस्त्यावर अलीकडे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोव्याला ये-जा करणारी वाहने सुसाट धावतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. याचा स्थानिक नागरिकांसह, लहान वाहनधारकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी या रस्त्यावरील किणयेपासून ते पिरनवाडीपर्यंतच्या टप्प्यावरती खड्डय़ांच्या ठिकाणी पॅचवर्कचे कामकाज करण्यात आले. मात्र हे कामकाज केवळ नावापुरतेच करण्यात आले. कारण पॅचवर्क केलेल्या अवघ्या पंधरा दिवसानंतरच त्या ठिकाणी पुन्हा परिस्थिती खड्डेमय बनली. तर रस्त्याच्या बहुतांशी ठिकाणी असलेले खड्डे बुजवण्यात आले नाहीत, अशी माहितीही नागरिकांनी दिली.

 रस्त्याचे पॅचवर्क करण्यासाठी ज्या कंत्राटदराने हे कामकाज घेतले होते. त्याने केवळ पॅचवर्कचे सोंग केले असावे, अशी माहिती या भागातील काही तरुणांनी दिली आहे. त्यामुळे अशा कंत्राटदाराची वरि÷ अधिकाऱयांनी चौकशी करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

पिरनवाडी, टिपूसुल्ताननगर, हुंचेनहट्टी, वाघवडे, बाळगमट्टी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, कावळेवाडी, बहाद्दरवाडी कर्ले, किणये, संतीबस्तवाड आदी भागातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्डय़ांमुळे या भागातील वाहनधारक वैतागून गेलेले आहेत. खड्डय़ांमुळे आपली वाहने नादुरुस्त होत आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या भागातील अनेक तरुणांचे या रस्त्यावर बळी गेलेले आहेत. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या रस्त्याची त्वरित पाहणी करून खड्डय़ांची योग्यरीतीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील वाहनधारक व नागरिकांतून करण्यात येत आहे.

वाहनधारकांना नेहमाघ्rाा त्रास सहन करावा लागते

पिरनवाडी ते किणयेपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. याचा आम्हा वाहनधारकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याकडे संबंधित अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज आहे. किणये गावच्या वेशीजवळ तर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यापूर्वी या ठिकाणी गावाजवळ बरेच अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. मुंगेत्री नदीजवळ टिप्परच्या धडकेत शेतकऱयांची जनावरे ही दगावलेली आहेत. अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे तसेच या रस्त्याची दुरुस्ती करावी.

- रवी गुरव - किणये

या परिसरातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. अलीकडे या रस्त्यावर गोव्याला ये-जा करणाऱया वाहनधारकांची संख्या वाढली आहे. काही महिन्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम म्हणजेच पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र हे काम योग्य प्रकारे करण्यात आलेले नाही. बऱयाच ठिकाणी खड्डे बुजवण्यात आलेच नाहीत. वास्तविक या भागातील लोकप्रतिनिधींनी त्याचवेळी सदर कंत्राटदाराला जाब विचारायला हवा होता. मात्र याकडे सारे जणच दुर्लक्ष करू लागले आहेत. याचा त्रास मात्र वाहनधारकांना रोजच्या रोज सहन करावा लागत आहे. रोज या रस्त्यावर होणाऱया वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घ्यावे.

- नरसिंग देसाई - कर्ले

Advertisement
Tags :

.