महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस उमेदवारावर राजदोहाचा गुन्हा

06:51 AM Feb 07, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदींविरोधात द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप

Advertisement

काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कथितरित्या आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपाप्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा नोंद झाला आहे. याचबरोबर अजय राय यांच्यावर वाराणसीच्या पिंडरा येथील एका गावात विना अनुमती प्रचार करण्यावरूनही आचार संहितेचे उल्लंघन तसेच कोरोना नियमांच्या अंतर्गत गुन्हा नादेंविण्यात आला आहे. अजय राय हे पिंडरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Advertisement

पिंडरा मतदारसंघाचे लोकल रिटर्निंग ऑफिसर यांच्या अहवालाच्या आधारावर फूलपूर पोलीस स्थानकात राय यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. राय यांच्यावर 124 अ (राजद्रोह) सह कलम 269 आणि 153 अंतर्गत गुन्हा नोंद झाला.

4 सदस्यीय समितीची चौकशी

अजय राय यांच्याविरोधात तक्रारी मिळाल्या होत्या. अजय राय यांनी स्वतःचे भाषण फेसबुकवर शेअर केले होते. या प्रकरणाची दखल घेत चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने अजय राय यांना दोषी ठरविले आहे. या मुद्दय़ावर अजय राय यांचे स्पष्टीकरण मागविण्यात आले, परंतु ते समाधानकारक नव्हते असे वाराणसीचे उपजिल्हाधिकारी आणि पिंडराचे रिटर्निंग ऑफिसर राजीव राय यानी सांगितले आहे.

भाजपकडून तक्रार

काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यासंबंधी ते आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसून येतात. 7 मार्च रोजी निवडणुकीच्या दिवशी मोदी आणि योगींना जमिनीत गाडून टाका असे त्यांनी लोकांना उद्देशून म्हटले होते. अजय राय यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणूक अधिकाऱयाकडे तक्रारही केली होती. माझ्या बोलण्याचा अर्थ मतदानाच्या दिनी जनतेने या सरकारला हटविण्याचे काम करावे असा होता असे स्पष्टीकरण अजय राय यांनी दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article