For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑफिस मॅनर्स

06:00 AM Oct 29, 2021 IST | Tarun Bharat Portal
ऑफिस मॅनर्स
Advertisement

आज काल छोटे शहर असो वा मोठे, प्रत्येक ठिकाणी नोकरी करणार्या स्त्रियांना ऑफिस मॅनर्स थोडे फार पाळावेच लागतात

Advertisement

  • ऑफिसमध्ये  सर्वांबद्दल आदर दाखवून बोला.
  • जिथे गरज वाटेल तिथे थोडय़ा फार प्रमाणात तिखट बोलणे आवश्यक असल्यास मी कसे बोलू? माझ्या नोकरीवर परिणाम होईल का? असा विचार न करता समोरचा फारसा दुखावला जाणार नाही, हे भान ठेवून बोला.
  • तुम्ही करत असलेले काम आणि वेळ याची सांगड घालून वेळेत काम करा. कुणालाही तुमच्या कामाबाबत बोलण्याची अथवा तक्रार करण्याची संधी देऊ नका.
  • बॉसच्या समोर अथवा तुमच्या सहकार्यांबरोबर बोलताना तुमची बॉडी लँग्वेज काही चुकीचा संदेश दर्शवणार नाही, याचे भान ठेवा.
  • बॉसपर्यंत इतर सहकार्यांबद्दल तक्रारी किंवा इतरांचे नुकसान होईल असा संदेश पोहोचवू नका.
  • इतरांच्या कामाबद्दलच्या तक्रारी बॉसच्या पुढय़ात करुन तुम्ही बॉसच्या नजरेत मोठे व्हायचा प्रयत्न करत असाल तर बॉसला योग्य तो मेसेज मिळाल्यास तुम्ही नजरेतून उतराल, हे लक्षात ठेवा.
  • ऑफिसमध्ये वावरताना पोशाखाकडेही काटेकोरपणे लक्ष द्यायला हवे. पोशाख नेहमी सैलसर आणि वावरायला सोयीस्कर असावा.
  • हल्ली काही ठिकाणी जिन्स किंवा लेगींग्ज आणि टॉपचा वापर केला जातो. पण टॉपचा वापर करताना तो फार तंग किंवा घट्ट असेल असा वापरु नका.
  • ऑफिसमध्ये पुरुष सहकार्यांशी प्रमाणापेक्षा जास्तच गप्पा, फोन करणे झाले की गॉसिपींग सुरु होतेय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे  यावर थोडे बंधन घालणे तुमचीच जबाबदारी.
  • मुंबई, पुणे, बेंगलोरसारख्या मेट्रोसिटीमध्ये ऑफिस व्हॅनचा वापर होतोय. घरी सोडताना रात्री, अपरात्री पुरुष सहकारी किंवा व्हॅनचा ड्रायव्हर यांच्याशी संबंध येतो. पण शक्यतो महिला सहकार्यांशिवाय वरीलपैकी कुणाच्याही भरवशावर जाऊ नका.
  • आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.
Advertisement
Tags :

.