ऑनलाईन वरून तब्बल 58 हजार 200 रूपयांना गंडा
प्रतिनिधी/ .महाबळेश्वर
ऑनलाईन व्यवहार करताना दाखविलेला निष्काळजीपणा एका जोडप्याला चांगलाच महागात पडला आहे ऐन संक्रातीच्या दिवशी एका चोरटयाने बस आरक्षणाच्या बहाण्याने जोडप्याला ऑनलाईन वरून तब्बल 58 हजार 200 रूपयांना गंडा घातला आहे या बाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असनु महाबळेश्वर पोलिस पुढील तपास करीत आहे
मेट गुताड ता महाबळेश्वर येथील कल्पेश मंगलदास बावळेकर हा नोकरी निमित्त मुंबईला राहतो आजीच्या अंत्यसंस्कारासाठी तो आपली पत्नी प्राजक्ता हिला घेवुन तो गावी आला होता पुन्हा मुंबईला जाण्यासाठी बस आरक्षण करणे आवश्यक होते म्हणुन त्याने रेड बस या ऑनलाईन बस आरक्षण करणारे कंपनीला फोन लावला कंपनीत फोन उचलणारे व्यक्तीने संभाषणा नंतर कल्पेश याला आपल्या मोबाईल मध्ये डेक्स ऍप्लीकेशन डाउनलोड करा असे त्या व्यक्तीने सांगितले कल्पेश याने त्या रेड बस कंपनीतील व्यक्तीने दिलेल्या सुचने प्रमाणे आपल्या मोबाईल मध्ये डेक्स ऍप्लीकेशन डाउनलोड केले डेक्स ऍप्लीकेशन मुळे कल्पेश यांची बॅक खात्याची सर्व माहीती त्या व्यक्तीला मिळाली त्याने कल्पेश याच्या येस बॅक खात्यातुन परस्पर 1200 व त्या नंतर पुन्हा थेट 57 हजार रूपये लांबविले असे एकुन 58 हजार 200 रूपये कल्पेश याच्या बॅक खात्यातुन त्या चोरटयाने लांबविले या बॅक खात्यातुन काढण्यात आलेल्या रक्कमे बाबत मोबाईल वर मॅसेज येताच रेड बस कंपनीतील व्यक्तीने आपली गोपनिय माहीती मिळवुन बॅक खात्यातुन रक्कम काढुन फसवणुक केल्याचे बावळेकर जोडप्याच्या लक्षात आले कल्पेश व त्याची पत्नी प्राजक्ता यांनी या बाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेवुन तक्रार दाखल केली पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेवुन फसवणुकी बाबत सर्व माहीती सातारा येथील सायबर सेल कक्षाला दिली सायबर सेल विभागाने ऑनलाईन चोरीचा तपास सुरू केला असल्याची माहीती महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक बी ए कोंडुभैरी यांनी दिली
ऑल लाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे म्हणुन प्रत्येक बॅक आपल्या खातेदारांना ऑनलाईन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करतात आपली माहीती अनोळखी व्यक्तीला फोन वरून देवु नका असे वारंवार सांगत असते तरी देखिल काही मंडळी ऑनलाईन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घेत नसल्याने अशा प्रकारे फसवणुकी होते तरी महाबळेश्वर येथील सर्वांनी अशा चोरटयां पासुन सावधगिरी बाळगणे हाच उपाय आहे नागरीकांनी ऑनलाईन व्यवहार करताना गोपनिय माहीती देवू नका असे आवाहन महाबळेश्वर पोलिसांनी केले आहे