कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एल्डरली एज ब्रिटनचे सर्वात श्रीमंत गाव

07:51 AM Jun 15, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

4780 लोकसंख्या, गावात 200 हून अधिक आलिशान कार्स

Advertisement

ब्रिटनमधील एल्डरली एज या गावाची लोकसंख्या केवळ 4780 आहे, पण येथे पोर्सा, लँबोर्गिनी, ऑडी आणि बेंटले यासारख्या आलिशान कार्सची संख्या 200 हून अधिक आहे. याचमुळे एल्डरली एजला ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. पण या कार्समुळे येथील लोक मात्र आनंदी नाहीत.

Advertisement

स्थानिक लोकांनी अलिकडेच नॉथं इंग्लंड येथील पोलीस विभागात तक्रारी नोंदविल्या आहेत. या आलिशान कार्समुळे गावातील रस्ते नेहमी भरलेले असतात असे लोकांचे म्हणणे आहे.

गावात ठिकठिकाणी छायाचित्रकारांची गर्दी होते. गावात वाहनांच्या वेगाची मर्यादा 30 किलोमीटर प्रतितास आहे. पण या आलिशान कार्स चालविणाऱयांकडून 80 ते 90 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठला जातो. यामुळे रस्त्यांवर जाण्यास लोक घाबरत आहेत. रस्त्यांवरून हिंडणे तर दुर्लभ ठरले आहे. याचमुळे या कारचालकांच्या विरोधात योग्य कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या गावात अनेक विदेशी धनाढय़ देखील राहतात.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article