एनईईटी-एमडीएस परीक्षा लांबणीवर
07:00 AM Feb 18, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
Advertisement
केंद्र सरकारने यावषी होणाऱया एनईईटी-एमडीएस परीक्षा एक ते दीड महिन्यासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी यासंबंधी अधिकृत माहिती दिली. 2022 च्या परीक्षांची तारीख 4 ते 6 आठवडय़ांनी वाढवली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार एमडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण करण्याची तारीख 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात येत असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत दंतचिकित्सा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मागणीला अनुसरून परीक्षा लांबणीवर टाकण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते.
Advertisement
Advertisement
Next Article