ऍपलच्या नव्या उत्पादनांचे लवकरच सादरीकरण
8 मार्च 2022 रोजी इवेंट : मॅकबुक प्रो, मॅकबुक एअरसह स्वस्त आयफोन सादर होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयफोन निर्मिती करणारी दिग्गज कंपनी ऍपलकडून आपल्या 2022 मधील कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. सदरचा कार्यक्रम हा 8 मार्च रोजी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नवीन मॅकबुक प्रो, मॅकबुक एअर, मॅक मिनी आणि आयमॅक प्रो याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
वरील सर्व उत्पादने ऍपल एम1 आणि एम2 चिपसेटसोबत सादर करु शकते. यासोबत आयफोन एसइ 3 याचाही इवेंटमध्ये सादर केला जाणार असून ऍपलचा स्वस्त आयफोन दाखल होण्याकडेही सर्वाचे लक्ष राहणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार 8 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण हे कंपनीने आपल्या युटय़ूब चॅनेलसह ऍपल टीव्हीवर लाईव्ह पद्धतीने सादर करण्याचे ठरविले आहे. ऍपलने इव्हेंटबाबतचा एक टीझर सादर करत त्यामध्ये ऍपलच्या लोगो सोबत पीक परफॉर्मन्स ही टॅगलाईन दिली आहे.
काय सादर होणार ?
- कंपनीने आपल्या कार्यालयीन दिलेल्या माहितीमध्ये सादर करण्यात येणाऱया उत्पादनांबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये खालील उत्पादनांचा समावेश होणार आहे.
- मॅकबुकमध्ये एम2, एम1 प्रो, एम1मॅक्स चिपसेट सपोर्ट
- नवीन मॅकबुकमध्ये मॅकबुक प्रो, मॅकबुक एअर आणि मॅक मिनीला एम2
- आयमॅक प्रो, यासोबतच स्वस्त आयफोन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.