For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायली सैन्याचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टीमेटम

06:22 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायली सैन्याचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टीमेटम
Advertisement

राफामध्ये मोठ्या हल्ल्याची तयारी : स्थलांतर करण्याचा आदेश जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ राफा

मागील वर्षापासून सुरू झालेले इस्रायल-हमास युद्ध अद्याप संपलेले नाही. आता इस्रायलने राफा या शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. इस्रायलकडून या शहरावर कुठल्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. याचमुळे इस्रायलच्या सैन्याने सोमवारी पॅलेस्टिनी नागरिकांना पूर्व राफा रिकामी करण्याचा निर्देश दिला आहे. या शहरात 10 लाखाहून अधिक युद्धविस्थापित पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे.

Advertisement

अरबी संदेश, टेलिफोन कॉल्स आणि फ्लायर्सद्वारे इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना 20 किलोमीटर अंतरावरील विस्तारित मानवीय क्षेत्र संबोधिल्या जाणाऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्देश दिला आहे. राफाच्या रहिवाशांना मर्यादित कक्षेच्या अंतर्गत तेथून हटण्याचे निर्देश देण्यात येत असल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले.

हमासविरोधी युद्धाच्या 7 महिन्यांमध्ये इस्रायलने राफा येथे कारवाई करण्याचा इशारा अनेकदा दिला आहे. राफामध्ये हमासचे हजारो दहशतवादी असून त्यांनी तेथेच ज्यू ओलिसांना ठेवल्याचे इस्रायलच्या सैन्याचे मानणे आहे. राफावर कारवाई केल्याशिवाय विजय अशक्य असल्याचे इस्रायलच्या सैन्याचे मत आहे.

घर रिकामी करण्यासाठी कॉल्स

पाश्चिमात्य देश आणि शेजारी इजिप्तकडून इस्रायल आणि हमास यांच्यात नव्या शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी करण्यात येत आहे. राफामधील रहिवाशांना इस्रायलच्या सैन्याकडून घरे रिकामी करण्यासाठी फोन कॉल्स केले जात आहेत. तर राफा शहरावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात 20 लोक मारले गेल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे गाझामध्ये केरेन शालोम क्रॉसिंगवर हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात तीन इस्रायली सैनिक मारले गेले आहेत

Advertisement
Tags :

.