For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इलेक्ट्रिक वाहन विक्रीत 20 टक्क्यानी वाढ

03:58 PM Apr 21, 2020 IST | Tarun Bharat Portal
इलेक्ट्रिक वाहन विक्रीत 20 टक्क्यानी वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

Advertisement

देशातील इलेक्ट्रिक वाहानांची विक्री
2019-20 मध्ये तब्बल 20 टक्क्मयांनी वधारत 1.56 लाखाच्या घरात पोहोचली आहे. प्रामुख्याने
दुचाकी वाहनांची विक्री वाढल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या  विक्री तेजी पहावयास मिळाली आहे. यात ई रिक्षाचाही
समावेश असल्याचे सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक वाहने यांनी ही आकडेवारी
सोमवारी सादर केली आहे.

2018-19 मध्ये एकूण इलेक्ट्रिक वाहन विक्री
1.3 लाख झाली होती. तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एकूण वाहन विक्री 1.52 लाखाच्या घरात
पोहोचली आहे. यात दुचाकी वाहने 3,400 कार आणि जवळपास 600 बसेस यांचाही यात समावेश आहे.
हाच आकडा 2018-19 मध्ये 1.26 लाख दुचाकी वाहने आणि 3,600 कार व 400 बसची विक्री झाली
होती. ई रिक्षाची सर्वाधिक विक्री झाली असून आतापर्यंत असंघटीत क्षेत्रात जास्त विक्री
झाली असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.