इंडियन वेल्स स्पर्धेतून ओसाकाची माघार
06:00 AM Sep 24, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
इंडियन वेल्स : पुढील महिन्यात येथे होणाऱया बीएनपी पेरिबस खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेतून जपानच्या नाओमी ओसाकाने माघारीची घोषणा केली आहे. आपणाला काही दिवस विश्रांतीची जरूरी भासत असल्याने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत खेळू शकणार नाही, असे ओसाकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. अलीकडेच झालेल्या अमेरिकन खुल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेवेळी आपण काही दिवस टेनिसपासून दूर राहण्याची योजना आखली होती. अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत ओसाकाला तिसऱया फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. ओसाकाने आतापर्यंत चारवेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहे. 2018 साली 23 वर्षीय ओसाकाने इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली होती.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article