महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंटरनेटवर व्हायरल झाला ‘टिफिन बॉक्स’

07:00 AM Mar 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आईने मुलासाठी पॅक केला ‘सुंदर’ सँडविच

Advertisement

सकाळी मुलांचा टिफिन तयार करणे आणि पॅक करण्यात त्यांच्या आईला मोठी कसरत करावी लागते. तर एक आई स्वतःच्या मुलासाठी इतका सुंदर लंचबॉक्स पॅक करते की इंटरनेटवर तिचा टिफिनच व्हायरल झाला आहे. दरदिनी लंचबॉक्समध्ये एकाहून एक मजेदार डिझाइन्स तयार करण्यात आल्या, यामुळे डबा उघडताच मुलीने तो संपविला आहे.

Advertisement

जर्मनीच्या सिल्की या इतका क्रिएटिव्ह आहेत की त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी लंचबॉक्स पॅक करतानाही स्वतःच्या कलेचे भरपूर प्रदर्शन केले आहे. सकाळी घाईगडबडीत अनेक महिला कमी वेळेत तयार होणारे खाद्यपदार्थ तयार करतात. तर सिल्की मात्र भरपूर वेळ काढून मुलीचा टिफिन सजविते.

मुलीच्या लंचबॉक्समध्ये सुंदर दृश्यांपासून प्राणी आणि फुल-पानांची कलाकृतीही असते. त्यांनी मुलीच्या लंचबॉक्सची छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड करताच लोकांनी ती अत्यंत पसंत पडली आहेत. सिल्की अशाप्रकारच्या क्रिटटिव्ह कल्पनांसाठी कुकी कटर आणि चाकूची मदत घेतात, जेणेकरून फळ-भाज्यांना योग्य आकारात कापता येईल.

सुंदरतेसह मुलीच्या पोषणाचीही सिल्की काळजी घेतात. टिफिनमध्ये ओटमील, प्रूटकप आणि वेगवेगळय़ा प्रकारच्या पोषकघटकांनी भरपूर खाद्यपदार्थांना त्या उत्तमप्रकारे मांडतात. टिफिन बॉक्समध्ये बेडूक, मधमाशी, अस्वल आणि बदकाच्या आकारात कापलेली फळे दिसून येतात.

गाजर, सीवीड, ब्ल्यूबेरीज, स्ट्रॉबेरी आणि ब्रॉक्ली यासारख्या भाज्यांना मुलीच्या पसंतीच्या चित्रांमध्ये कापून तिच्या लंचबॉक्समध्ये ठेवतात. अनेकदा मुलांच्या पसंतीचे कार्टून कॅरेक्टर्स देखील सिल्की खाण्यापिण्याच्या पदार्थांद्वारे सादर करतात. जर्मन आईची क्रिएटिव्हिटी पाहून इंटरनेटवर लोक आश्चर्यचकित आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article