For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएल- 2024 चा महामुकाबला आज

06:58 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयपीएल  2024 चा महामुकाबला आज
Advertisement

कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी, गौतम गंभीरचे डावपेच व पॅट कमिन्सचे कौशल्य  

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

आयपीएलचा झळाळता चषक कुणाला प्राप्त होईल त्याचा निकाल आज रविवारी लागणार असून येथे होणाऱ्या मेगा फायनलमध्ये उत्साही सनरायझर्स हैदराबादचा सामना तितक्याच आक्रमक कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. यावेळी रणनीतीच्या दृष्टीने गौतम गंभीरचे डावपेच आणि हसतमुख परंतु निर्दयी पॅट कमिन्सचे कौशल्य यांच्यातही एक वेगळा सामना रंगेल.

Advertisement

अंतिम लढती या नेहमीच दोन्ही बाजूंच्या कर्णधारांचा कस पाहणाऱ्या ठरल्या आहेत. पण ही आयपीएल फायनल गंभीरच्या डावपेचांची कस पाहणारी असेल. ‘केकेआर’चा श्रेयस अय्यर हा कर्णधार म्हणून त्याची दुसरी फायनल खेळत आहे. पण रणनीती आखण्याच्या बाबतीत तो बाजूला पडलेला असून कमिन्ससमोर मुख्य आव्हान हे गंभीरच्या डावपेचांचे राहील. एका दशकापूर्वी कमिन्स कर्णधार बनून सहा महिन्यांच्या कालावधीत एकदिवसीय विश्वचषक, जागतिक कसोटी स्पर्धा आणि अॅशेस जिंकेल असे कुणालाही वाटले नसते आणि आता प्रथमच सनरायझर्सचे नेतृत्व करताना त्याने संघाला जर आयपीएलचा चषक जिंकून दिला, तर कमिन्ससाठी ते आणखी एक अभिमानास्पद यशोशिखर ठरेल.

पहिल्या क्वॉलिफायरमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात केकेआरने मोटेरा मैदानावर चतुराईने सनरायझर्सला पराभूत केले होते आणि चेन्नईमध्ये अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचेच पारडे जड राहील. यापूर्वी केकेआर चेन्नईत मागील आयपीएल फायनल 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविऊद्ध खेळला होता. तो सामना चुरसपूर्ण राहून त्याने गंभीरची चतुर कर्णधार म्हणून ओळख प्रस्थापित केली होती. त्यात त्याने फक्त योग्य गेम प्लॅनच अमलात आणला नव्हता, तर योग्य दिशेने मन लावून प्रयत्नही केले होते.

गंभीरने 2014 मध्ये आणखी एक विजेतेपद पटकावले आणि आता तो कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून एकाच संघातर्फे आयपीएल चषक जिंकणारा पहिली व्यक्ती ठरण्याच्या उंबरठ्यावर आहे. याचा मोठा फायदा गंभीरला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुकीतून होऊ शकतो आणि आयपीएल चषक जिंकल्यास गंभीरची केवळ विश्वासार्हताच वाढणार नाही, तर तो भारतीय ड्रेसिंगमध्ये राहण्याची मागणी देखील वाढेल. खेळाडूंची तुलना केली, तर ‘केकेआर’कडे सुनील नरेन, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर, नितीश राणा आणि हर्षित राणा यांच्या रूपाने अधिक मॅच-विनर्स आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे फिरकीपटू वऊण चक्रवर्ती आहेत.

तथापि, अजूनपर्यंत भारतातर्फे खेळण्याची संधी न मिळालेल्या अभिषेक शर्मा, नितीश रे•ाr यासारख्या सनरायझर्सच्या देशी स्टार्सनी भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि जयदेव उनाडकट यासारख्या खेळाडूंसमवेत खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. सनरायझर्सचा रॉयल्सवरील 36 धावांनी विजय निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढवून गेलेला असेल. पण चेपॉकची खेळपट्टी वऊण (20 बळी) आणि नरेन (16 बळी) यांच्यासाठी अनुकूल असेल हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. हे दोन्ही गोलंदाज संपूर्ण हंगामामध्ये फॉर्मात राहिले आहेत. त्यातुलनेत अभिषेक आणि शाहबाज अहमद यांचा सामवेश असलेला सनरायझर्सचा फिरकी विभाग जरी आत्मविश्वासात कमी असला, तरी दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये या दोघांनी 8 षटकांत 37 धावा देऊन 5 बळी घेऊन दाखविलेले. त्यांच्या कामगिरीने सदर सामन्याची दिशा बदलली.

180 ते 200 यादरम्यानचे कोणतेही लक्ष्य फायनल खेळण्याचे दडपण लक्षात घेता खूप स्पर्धात्मक ठरू शकते.  ट्रॅव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन यांनी अवघड खेळपट्ट्यांवर धावा वेपेल्या आहे. परंतु सनरायझर्सची सरशी होण्यासाठी अभिषेक, राहुल त्रिपाठी आणि रे•ाr यासारख्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवावी लागेल. या खेळपट्टीवर चेंडू कमी वेगात टाकणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे केकेआरचे युवा वेगवान गोलंदाज हर्षित आणि वैभव अरोरा यांना हेडविऊद्ध चाकोरबाहेरचा विचार करावा लागेल. हेडने आतापर्यंत 567 धावा केलेल्या आहेत. ंआयपीएल फायनलचा एक मनोरंजक पैलू म्हणजे या सामन्यात भारताच्या टी-20 विश्वचषक संघात निवड झालेला एकही खेळाडू दिसणार नाही. याला काहीसा अपवाद फक्त रिंकू सिंग आहे, जो राखीव खेळाडूंत समाविष्ट आहे.

संघ : सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, अब्दुल समद, नितीश रे•ाr, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, झाथवेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फाऊकी, मार्को जेनसेन, आकाश महाराज सिंह, मयंक अग्रवाल.

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन सकरिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रहमान.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा

Advertisement
Tags :

.