कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार अपात्रताप्रकरणी याचिका 24 रोजी सुनावणीस

10:30 AM Sep 22, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी /पणजी

Advertisement

आमदार अपात्रताप्रकरणी सभापती राजेश पाटणेकर यांनी दिलेल्या निवाडय़ाला आव्हान देणारी मगो पक्षाची याचिका येत्या शुक्रवार दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे. ही याचिका न्या. मनिष पितळे व न्या. एम.एस जवळकर यांच्या वतीने न्यायपीठासमोर सुनावणीस येणार आहे.

Advertisement

मगो पक्षाच्या वतीने आमदार सुदिन ढवळीकर यांनी सदर याचिका सादर केली असून मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये विलीन झालेले आमदार मनोहर उर्फ बाबू आजगांवकर व आमदार दीपक पावसकर यांना या याचिकेत प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षच भारतीय जनता पक्षात विलिन केल्याचा दावा सभापती समोर करण्यात आला होता. सभापतींनी तो उचलून धरुन पक्षांतर करणाऱया या दोघा आमदारांना पात्र ठरवले होते.

न्यायमूर्ती झाले निवृत्त

गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या 10 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरील सुनावणी मुंबई येथील खंडपीठासमोर ऑनलाईन ठेवण्यात आली होती. सदर याचिका न्यायमूर्ती के. के. तातेड व न्या. पृथ्वीराज चव्हाण या खास न्यायपीठासमोर दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी सुनावणीस आली तेव्हा याचिकादाराची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल गैरहजर होते त्यामुळे सुनावणी बुधवार दि. 22 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार न्यायमूर्ती के. के. तातेड दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी निवृत्त झाल्याने आता गिरीश चोडणकर यांची याचिका कुठल्या न्यायपीठासमोर सुनावणीस येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article