आजारामुळे हसताच येत नाही
ब्रिटनमधील मुलाला अजब आजार
काही लोकांना साध्यासाध्या गोष्टींवर हसू येत असते, तर काही लोक फारच कमी वेळा हसत असतात. परंतु एका मुलाच्या चेहऱयावर कधीच हास्य दिसून आले नाही. हा मुलगा उदास नसून तो एका आजारामुळे इच्छा असूनही जोरात हसू शकत नाही.
सर्वसाधारणपणे मुले छोटय़ाछोटय़ा गोष्टींवर आनंदी होत हास्यात बुडून जातात. परंतु 9 वर्षीय मुलाला कितीही आनंद झाला तरीही हसता येत नाही. इंग्लंडच्या वेल्स शहरात राहणाऱया या मुलाचे नाव आयजॅक ह्युजेज आहे. अत्यंत कमी वयाच्त्च त्याला या अजब आजारामुळे हसताच येत नाही. एवढेच नव्हे तर त्याला नीटपणे बोलताही येत नाही.
आयजॅकला जन्मापासूनच माएबियस सिंड्रोम नावाचा धोकादायक आजार असून यामुळे त्याचा चेहरा पॅरालाइज्ड झाला आहे. हा आजार अत्यंत दुर्लभ आहे. न्यूरोलॉजिकल आजारामुळे रुग्णाच्या चेहऱयावरील रक्तवाहिन्या कठोर होत असतात. रुग्णाला हसण्यासह बोलताना आणि जेवतानाही समस्या होत असते. लहानपणापासूनच आयजॅकला खाताना त्रास व्हायचा आणि वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत आयजॅक बोलू देखील शकत नव्हता. तो हातांच्या खुणांद्वारे संवाद साधत होता. आईवडिलांना तो काय सांगू पाहतोय हे समजून घेणे अवघड ठरते, परंतु त्याचा भाऊ आयजॅकला काय म्हणायचंय हे चांगल्याप्रकारे समजत आहे.
मोबियस सिंड्रोम नावाच्या आजाराने त्रस्त जॅकने वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत एक शब्दही उच्चारला नव्हता. परंतु तो नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत होता. वयाच्या 7 व्या वर्षी जॅक पहिल्यांदा काही शब्द उच्चारू शकला. आयजॅकला फुटबॉल खेळणे आणि स्वतःच्या मित्रांसोबत वेळ घालविणे पसंत आहे.