आंचिममध्ये असणार ऍनिमेशनप्रेमींच्या मनोरंजनाची हमी
प्रतिनिधी /पणजी
ऍनिमेशन म्हणजे आभासी चलतचित्रांच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे प्रेक्षकांना शिक्षित करणे आणि कार्यप्रवृत्त करणे. उठावदार रंगसंगती, पात्रांच्या सर्व कोनांमधून होणाऱया वैशिष्टय़पूर्ण हालचाली, आणि हृदयाला भिडणाऱया साध्या संकल्पना किंवा संदेश, यामुळे ऍनिमेशन हा प्रकार लहान मुलांना खूप आवडतो. मात्र आतापर्यंतचे अनेक सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट हे अधिक प्रगल्भ प्रौढ प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आले आहेत. गोव्यात 20 ते 28 रोजीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रसिकांना या चित्रपट-कलेच्या विविध शैलींचे अनोखे मिश्रण पाहायला मिळणार आहे. लहान मुले आणि प्रौढ अशा दोन्ही वयोगटांना आवडू शकणाऱया कथा असलेले, जगभरातील विविध भागांतील पाच ऍनिमेशनफट महोत्सवात खास तयार केलेल्या ऍनिमेशनपट विभागात दाखवले जाणार आहेत.
‘ब्लाईंड विलो स्लीपिंग वुमन’ 2022 सालचा हा जपानी ऍनिमेशनपट प्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या लघुकथांवर बेतला आहे. हा चित्रपट केवळ मुराकामींच्या जगभरातील लाखो चाहत्यांनाच नाही, तर लेखकाचा परिचय नसलेल्या चित्रपट रसिकांनाही भावेल, अशा तऱहेने बनवण्यात आला आहे. ‘माय लव्ह अफेयर विथ मॅरेज’, ‘द आयलँड’, ‘ डझन्स ऑफ नॉर्थ्स’, ‘ पिनोकिओ’,