कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अहो आश्चर्यम्! न्यूझीलंडची विजयी गदाही 14 दिवस क्वारन्टाईन!

07:56 AM Jun 30, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑकलंड / वृत्तसंस्था

Advertisement

उद्घाटनाची आयसीसी कसोटी विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर न्यूझीलंडचे क्रिकेटपटू एव्हाना मायदेशी परतले आहेत. मात्र, कोरोनामुळे प्रवासावरील विविध निर्बंधांचे पालन करणे भाग असल्याने हे सर्व खेळाडू सध्या येथील एका हॉटेलमध्ये 14 दिवसांकरिता क्वारन्टाईन आहेत. आश्चर्य म्हणजे या संघाने जी कसोटी चॅम्पियनशिपची गदा जिंकली, ती देखील खेळाडूंसमवेत 14 दिवसांकरिता क्वारन्टाईन आहे.

Advertisement

भारतातून प्रवास करणाऱया प्रवाशांवर कडक निर्बंध असल्याने 14 दिवसांचे क्वारन्टाईन सक्तीचे आहे आणि या खेळाडूंनी समवेत आणलेला कोणताही घटक बाहेर सुपूर्द करता येणार नसल्याने कसोटी चॅम्पियनशिपच्या विजयी गदेवर देखील क्वारन्टाईन कालावधी पूर्ण करण्याचे बंधन आहे!

भारत-न्यूझीलंड यांच्यात मागील आठवडय़ात संपन्न झालेल्या कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने रोमांचक लढतीची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात भारतीय संघाने घोर निराशा केली आणि न्यूझीलंडने एकतर्फी मात्र दिमाखदार विजय साकारत विजयी गदा आपल्या नावावर केली.

विजय संपादन केल्यानंतर किवीज संघाचा संयमी कर्णधार केन विल्यम्सनने हॅम्बल्डन मैदानाला भेट दिली आणि त्यानंतर दोन दिवसांनी पूर्ण न्यूझीलंडचे पथक मायदेशी दाखल झाले. याबद्दल बोलताना किवीज जलद गोलंदाज नील वॅग्नर म्हणाला, ‘सोशल डिस्टन्सिंग पाळणे भाग असल्याने आम्ही कोणाशीही हस्तांदोलन करु शकत नव्हतो. आमच्याकडे गदा होती आणि चाहत्यांना त्याची छायाचित्रे घ्यायची होती. त्यामुळे, गदा कुठे आहे, अशी विचारणा त्यांच्याकडून होत होती. पण, अंतर पाळणे आवश्यक होते. सध्या गदा बीजे वॅटलिंगच्या रुममध्ये आहे. वॅटलिंग या मालिकेनंतर निवृत्त झाला आहे. त्यामुळे, आम्ही 2 आठवडय़ांच्या क्वारन्टाईन कालावधीत ही गदा त्याच्याकडेच राहू देणे पसंत केले आहे’.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article