For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी अर्बन बँक ठाणे जनता सहकारी बँकेत विलीन होणार !

10:07 PM Jun 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी अर्बन बँक ठाणे जनता सहकारी बँकेत विलीन होणार
Advertisement

सावंतवाडी / प्रतिनिधी

Advertisement

1947 साली स्थापन करण्यात आलेली सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही ठाणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार हे आज झालेल्या सभेत स्पष्ट झाले आहे. विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावासाठी आज शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. या सभेत विलीनीकरण प्रस्तावासाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. मतदान प्रक्रिया राबविताना सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत विलीनीकरणाच्या प्रस्तावासाठी 485 सभासदांनी मतदान केले त्यापैकी 473 सभासदांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ३ सभासदांनी विरोधी बाजूने तर ९ सभासदांची मते बाद झाली. अशाप्रकारे झालेल्या मतदानापैकी बहुमताने ठाणे जनता अर्बन सहकारी बँके कडे सावंतवाडी अर्बन बँक विलीनीकरण करण्याच्या ठरावास सर्वानुमते सहमती आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्राप्त झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी अर्बन बँक आता विलीनीकरण होणार आहे हे निश्चित झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार व बँकेच्या इतिहासात बँक विस्तारीकरण साठी मतदान प्रक्रिया होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. विस्तारीकरण प्रस्ताव मतदान प्रक्रियेत बहुमताने प्रस्तावना ठराव मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईहून सावंतवाडीत सायंकाळी दाखल होत मतदान केले. त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले ही बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार विलीनीकरण करावी लागत आहे. मात्र ही बँक चांगल्या स्थितीत यावी म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मी जवळपास सात ते आठ कोटी रुपये प्राप्तही करून दिले. परंतु रिझर्व्ह बँकेने 30 दिवसाची मुदत विस्तारीकरण करण्यासाठी आखून दिल्यामुळेच पुढील प्रक्रिया राबवता येणे अशक्य झाले . आम्हाला मुदत मिळाली असती तर आम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि शासनाच्या माध्यमातून काही करता येऊ शकले असते का याचा प्रयत्नही केला असता मात्र ही बँक विलीनीकरण होताना खरंच दुःख होत आहे असेही ते म्हणाले.
सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही विलीनीकरण करावी असे रिझर्व्ह बँकेने महिन्याभरापूर्वीच तसे कळवले होते जर 30 जून पूर्वी विलीनीकरणाचा प्रस्ताव न प्राप्त झाल्यास बँकेचे लायसन रद्द करण्यात येईल असे सूचित केले होते .त्यामुळेच आम्ही सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर बँकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून ठाणे जनता सहकारी बँकेत ही बँक विलीनीकरण करावी काय यासाठी ठराव घेण्यासाठी आज शनिवारी बँकेच्या सभागृहात बैठक आयोजित केली आहे असे सुरुवातीला चेअरमन ॲड .सुभाष पणदुरकर यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement

.