For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

वाढीव कार्यकाळ नको; NSE चे CEO विक्रम लिमये

03:34 PM Mar 09, 2022 IST | Abhijeet Khandekar
वाढीव कार्यकाळ नको  nse चे ceo विक्रम लिमये

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Advertisement

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत असुन ते कालावधी वाढवून घेण्यास इच्छुक नाहीत. दुसऱ्या कार्यकाळासाठी स्वारस्य नसल्याने अर्ज करणार नसल्याचे आणि सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे विक्रम लिमये यांनी बोर्डाला सांगितलंय.

दरम्यान, विक्रम लिमये यांचा कार्यकाळ 16 जुलै 2022 रोजी संपत आहे. त्यांनी अत्यंत कठीण काळात NSE चे नेतृत्व करण्यासाठी आणि NSE स्थिर तसेच मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने खूप प्रगती केली. त्यांना दिलेल्या या पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्व स्टॉकहोल्डर्स,आणि सरकारचे आभार व्यक्त केलेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.