For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:01 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

विद्यार्थ्यांचा डीएनए-  परीक्षा  विशेष- 2

Advertisement

मागच्या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे या लेखाचा उद्देश विद्यार्थ्यांना, पालकांना,  शिक्षकांना  आणि ज्यांना ज्यांना विद्यार्थ्यांना मदत करायची आहे त्या सगळ्यांना होण्यासारखा आहे. हा जरी ज्योतिषीय लेख असला तरी दशकांचा अनुभव,  विद्यार्थ्यांशी केलेला संवाद, त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यावर झालेले  चांगले किंवा वाईट परिणाम यावर आधारित आहे. लेखाच्या शेवटी ज्योतिषीय संकल्पना आणि उपायांबद्दल चर्चा झाली असली तरी कठोर परिश्र्रम आणि ध्येयनिष्ठ समर्पित अभ्यास याला पर्याय नाही हे पुन: पुन्हा सांगतो. आपल्याकडे मुले अभ्यास करायला कंटाळा करायला लागली, अभ्यासात मुलांचे लक्ष नाही, असे झाले की ज्योतिषाला गाठतात आणि मग बऱ्याच वेळेला ज्योतिषी कालसर्प शांती करा, नवग्रह शांती करा, अमुक शांती करा आणि प्रमुख शांती करा, असे थातुर मातुर गल्लाभरू उपाय सांगतो आणि असे करून सुद्धा काहीही फायदा होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. मुळात जर कोणाला अभ्यास करायला कंटाळा येत असेल तर त्याचे कारण काय आणि त्याचे निवारण कसे करता येईल. याकडे कोणाचे लक्ष नसते.

मानवी जीवन आणि उत्क्रांती यातील बऱ्या वाईट अनुभवावरून बऱ्याच लोकांनी आपले बरेचसे नियम प्रस्थापित केले. त्यातला 1949 सालचा मर्फीचा नियम म्हणजे ‘ज्या गोष्टीबद्दल तुम्ही वाईट विचार करता किंवा ज्या गोष्टीबद्दल वाईट होऊ शकते, ते वाईट होतेच आणि त्या वेळेला जेव्हा सगळ्यात जास्त काळजी वाटत असते’, या नियमाप्रमाणे विचार केला तर मानवी जीवन हे दु:ख आणि वाईट घटना याशिवाय दुसरे काहीही असणारे नाही. म्हणून हा नियम विज्ञाननिष्ठ नाही (आणि म्हणूनच ‘परीक्षेत माझे काय होईल याचा विचार सोडा), याउलट भ्प्ज्rल्स्’s त्aw सांगतो की ‘जे काही चांगले होण्याची शक्मयता आहे ते सगळे चांगले होते’ (आणि म्हणूनच फाजील आत्मविश्वास सोडा). आपल्याला या दोन्ही मधला सुवर्णमध्य काढायचा आहे. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ विद्या प्राप्त करणारा. असे करण्याकरता काही नियम उपयोगी ठरतात. पहिला नियम म्हणजे नियमितता. रोज काही तास आपल्याला अभ्यास करायचा आहे हे निश्चित करून त्याप्रमाणे वागणे. याचा एक फायदा म्हणजे आपल्या मेंदूतील डोपामिन नावाचे रसायन तयार होते. म्हणजे एखादे अवघड काम केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण  शोधायला शाबासकी देतो. त्याप्रमाणे मेंदू डोपामिन तयार करून आपल्याला आनंदी करतो. दुसरा नियम म्हणजे आपल्याला विचलित करणाऱ्या इतर सगळ्या माध्यमांपासून दूर राहणे. आजकाल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा मोबाईल आणि स्क्रीन एडिक्शनचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये मोबाईल असतो. गेम खेळणे, चाट करणे सोशल मीडिया यांनी विद्यार्थ्यांचे जेवढे नुकसान केले आहे तेवढे कोणीच करू शकत नाही (हे सगळे राहू चे देणे!!) त्यामुळे कटाक्षाने यापासून दूर राहणे. तिसरा नियम 1, 3, 7, 9 चा आहे. म्हणजे ज्या दिवशी अभ्यास केला त्याच दिवशी रिव्हिजन करावी. त्याच्या तिसऱ्या दिवशी करावी, सातव्या दिवशी आणि नवव्या दिवशीही करावी. त्यामुळे जो अभ्यास कराल तो पक्का होतो. चौथा नियम ‘जशी संगत तशी रंगत’. याबद्दल जास्त न सांगणे बरे. पाचवा नियम आजकाल तऊणांना असे वाटते की आपण अभ्यास सोडून इतर क्षेत्रांमध्ये करोडो ऊपये कमवू शकतो.  आपण युट्यूबर होऊ शकतो, सोशल इनफ्लूएन्सर होऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, लाखो लोकांपैकी काहीच लोक ज्याप्रमाणे प्रसिद्ध अभिनेते होऊ शकतात. त्याप्रमाणे काहीच लोक या प्लॅटफॉर्मवर यश मिळवू शकतात. तुम्ही हे करू नका, असे माझे म्हणणे नाही पण संपूर्ण अभ्यासक्रम  चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यानंतरच याकडे वळा. पाचवा नियम, अभ्यास हा मार्क्सकरता कराच पण त्याहीपेक्षा ज्ञान मिळवण्याकरता करा.   आता काही ज्योतिषीय उपाय. प्रत्येक दिवसामध्ये 24 होरे असतात. त्यातील   बुधाच्या होऱ्यामध्ये अभ्यास सुरू करावा (खास करून गणित).  गुऊच्या  होऱ्यामध्ये  रिव्हिजन करावी. शनीच्या होऱ्यामध्ये पाठांतर करावे. मंगळाच्या होऱ्यामध्ये   कॉम्पिटिशनची तयारी करावी. आणखीन एक उपाय सांगतो, जेव्हा उजव्या नाकपुडीतून श्वास जास्त येत असेल तेव्हा अभ्यास-लेखन करावे आणि जेव्हा   डाव्या नाकपुडीतून श्वास जास्त येत असेल तेव्हा पाठांतर करावे. लेखाचा मथळा  विद्यार्थ्यांचा डीएनए आहे. इथे डी एन ए म्हणजे   Do Not Afread!!! !!! घाबरू नका, मोहाला बळी पडू नका, मन लावून अभ्यास करा, यश तुमचेच आहे!!!

Advertisement

Advertisement

मेष

हा आठवडा अतिशय आनंदात जाणार असे दिसते. नोकरीत असाल तर आपले काम अतिशय चांगल्या रीतीने आणि यशस्वीपणे कराल. साहजिकच वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. धाकट्या भावंडांचा सहवास मिळेल. कदाचित त्यांच्याबरोबर एखादी छोटी सहलही काढाल. खाण्यापिण्याची चंगळ कराल. नसते धाडस मात्र कऊ नका. मित्रांचे, शेजाऱ्यांचे सहकार्य चांगले लाभेल.

उपाय: दत्त महाराजांची उपासना करा.

वृषभ

मातेचा सहवास लाभेल. होईल तेवढी मातेची सेवा करा. वाहन खरेदीचा योग संभवतो. जमीन खरेदीच्या बाबतीत जर विचार करत असाल तर काम होण्याची शक्मयता आहे. प्रयत्न करण्यास हरकत नाही. विद्यार्थ्यानो, अभ्यासाकडे लक्ष द्या. चांगले प्रयत्न केलात तर यश नक्की मिळेल. पण तब्येत सांभाळून अभ्यास करा. वडिलोपार्जित इस्टेट अथवा द्रव्य मिळण्याची शक्यता आहे.

उपाय: पक्ष्यांना पाणी पाजा/द्या.

मिथुन

परीक्षेचे दिवस आहेत. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांचे मन भरकटू देऊ नका. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. अचानक धनलाभाची शक्मयताही संभवते. तुम्ही काही विद्याभ्यास करत असाल तर त्यात यश मिळण्याची शक्मयता आहे. वडिलांना कुठे तीर्थयात्रेला जायची इच्छा असेल, तर त्यांची इच्छा पूर्ण कराल. अथवा तसे प्रयत्न तरी निश्चित कराल.

उपाय: गणपतीच्या मूर्तीवरील निर्माल्यातील दुर्वा जवळ ठेवा.

कर्क

तब्येतीला सांभाळा. ऊन वाढत चाललेले आहे. कुठेही किंवा कुणाकडेही जाताना विचार करून जा. जिकडे आपला मान असेल तिथेच जावे. अन्यथा अपमान होण्याचा संभव आहे. नोकरावर जास्त विश्वास ठेवू नका. घरातील मौल्यवान वस्तू सांभाळा. लहान भावंडांचे सुख मिळेल. कोणत्याही कामात हात घालताना पूर्ण विचार करून हात घाला. यश मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय: कुलदेवतेची आराधना करा.

सिंह

वाणीवर नियंत्रण असू द्या. तुमच्या बोलण्याने कदाचित होणारे कामही होणार नाही. जोडीदाराबरोबर हा आठवडा चांगला जाईल असे दिसते. काही स्वतंत्र व्यवसाय करत असाल तर त्यात प्रगती संभवते. काही जुनी येणी असतील तर ती मिळण्याची शक्मयता आहे. विस्मरणात गेलेली किंवा हरवलेली वस्तू अथवा द्रव्य सापडण्याची शक्मयता आहे. वादविवाद टाळा.

उपाय:हनुमान चालीसा वाचा.

कन्या

लॉटरी अथवा तत्सम प्रकारातून द्रव्यलाभ होण्याची शक्यता आहे. पण त्या द्रव्याच्या हव्यासापायी चुकीचा मार्ग निवडू नका. नाहीतर खूप नुकसान होण्याचीही शक्यता आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. काहीतरी मानसिक व्यथा सतावत राहील अथवा घरातील माणसाच्या तब्येतीची काळजी लागून राहील. सांभाळून रहा. मन चंचल होऊ देऊ नका.

उपाय: नामस्मरण करीत जा.

तूळ

परोपकार करावासा वाटेल, करा. अडचणीत असलेल्यांची मदत करा. सत्संग घडण्याची शक्मयता आहे. संतांच्या संगतीत भाग्य उजळून निघेल. कुठेतरी दूरचा प्रवास अथवा तीर्थयात्रा घडेल. धार्मिकतेकडे वळाल. घरातील वृद्धांचा आशीर्वाद मिळेल. हा आठवडा सुख-समाधानात जाईल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन समाधानात आठवडा घालवा.

उपाय: मुक्या जीवाना खाऊ घाला.

वृश्चिक

स्वतंत्र व्यावसायिक असाल तर उद्योगात प्रगती होण्याची शक्मयता आहे. नोकरीत असाल तर पदोन्नती होण्याची शक्मयता आहे. प्रामाणिकपणे काम कराल तर यश नक्की आहे. आपल्या कामावर वरिष्ठ खुश होतील. मान-मरातब मिळेल. आणि या सर्वामुळे समाजातील दर्जा उंचावण्याची शक्मयता आहे. कर्ज प्राप्तीसाठी प्रयत्नात  असाल आणखी थोड्या प्रयत्नाने मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय: नित्यनेमाने लक्ष्मीची आराधना करा.

धनु

हा आठवडा आपल्याला सुखदायी ठरणार आहे असे दिसते. जुन्या मित्रांचा अगर वडील भावंडांचा सहवास मिळण्याची शक्मयता दिसते. द्रव्यलाभही होण्याची शक्मयता दिसते. उंची भेटवस्तू मिळतील. समाजात मान-सन्मान मिळेल. काही महत्त्वाकांक्षा बाळगून असाल तर धैर्याने व प्रामाणिकपणे काम करा. यश नक्की मिळेल. एकूण हा आठवडा तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ देण्याची शक्मयता आहे.

उपाय: तुळशीला पाणी घाला.

मकर

खर्चाला आळा घाला. योग्य त्या ठिकाणी खर्च करा. परदेशवारी करण्याची शक्मयता दिसते. ऊन वाढते आहे. बाहेर जाताना डोळ्याना सांभाळा. वाहन जपून चालवा. जिथे जाण्याने आपली मानहानी होईल अशा ठिकाणी जाऊ नका. आध्यात्मिक मार्गाला लागण्याची शक्मयता आहे. त्या मार्गाला लागाल तर जीवनाचे सार्थक करून घ्याल. पण बुवाबाजीत फसू नका.

उपाय: गुरूची आराधना करा.

कुंभ

मन चंचल होईल. त्यावर आळा घाला. मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर अस्वस्थ होणे, चिडणे, राग येणे अशा गोष्टी होतात. पण लक्षात ठेवा, आपल्या चिडण्याने, रागावण्याने त्या घडून गेलेल्या गोष्टीत काही फरक पडत नाही. निष्कारण आपल्याला मनस्ताप मात्र होतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. ज्या आपल्याला आनंद देण्याऱ्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्या, आनंद लुटा.

उपाय: पक्ष्यांना पाणी द्या.

मीन

कौटुंबिक सुख चांगले मिळेल. आपल्या परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. आपल्या बोलण्याने परिवारास आनंद मिळवून द्याल. आपली सांपत्तिक स्थिती चांगली राहण्याची शक्मयता आहे. आपल्या कर्तृत्वाचा आपल्या परिवारावर एक आदरयुक्त छाप पडेल. पूर्वार्जित संपत्तीसाठी काही चर्चा चालली असेल तर ती आपल्या फायद्याचीच ठरण्याची शक्मयता आहे.

उपाय: बाहेर पडताना कपाळावर केशरी गंधाचा टिळा लावा.

Advertisement
Tags :
×

.