For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशासाठी पथदर्शक असणारी निवडणूक

06:46 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशासाठी पथदर्शक असणारी निवडणूक
Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरु लागला आहे. ही निवडणूक देशाचा भविष्यकालीन मार्ग निर्णायकरित्या निर्धारीत करणारी ठरेल, असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष तसेच लोकशाही आघाडी विजयाची ‘हॅटट्रिक’ साधणार की विरोधी पक्ष त्यांना रोखणार या कळीच्या प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीत दडले आहे. ते आपल्यासाठी 4 जूनलाच दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. तोपर्यंतच्या चर्चा आणि दावे-प्रतिदावे केवळ अनुमानात्मकच असतील. एकीकडे, भारतीय जनता पक्ष त्याच्या सहकारी पक्षांसह, विजयाचा ‘त्रिकार’ साधायचाच, या ध्येयाने झपाटून कामाला लागलेला दिसून येतो. तर दुसरीकडे विरोधी पक्षही आघाडीच्या माध्यमातून सत्ता आपल्या हाती आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या चुरशीच्या संघर्षात कोण कोणावर मात करणार, हे केवळ आणि केवळ मतदारराजाच्याच हाती आहे. दै. तरुण भारत’ च्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीचे राष्ट्रीय स्तरावरील वृत्तांत या विशेष पृष्ठातून आमच्या चोखंदळ वाचकांना, आजपासून मतदानाचा अंतिम टप्पा पूर्ण होईपर्यंत सादर करणार आहोत. वाचकांचे प्रबोधन अन् मनोरंजन एकाच वेळी साध्य करण्याचा आमचा हेतू आहे. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे...

Advertisement

आतापर्यंतच्या निवणुकांमध्ये...

Advertisement

आतापर्यंत लोकसभेसाठी एकंदर 17 निवडणुका झाल्या असून यंदाची निवडणूक 18 वी आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्वीच्या निवडणुकांचाही संक्षिप्त परामर्श घेणे आवश्यक असल्याने क्रमाक्रमाने या निवडणुकांची माहिती वाचकांसाठी सादर करण्यात येत आहे. आजच्या पृष्ठात 1952 ते 1971 अशा प्रथम पाच लोकसभा निवडणुकांची ठळक वैशिष्ट्यो पुढीलप्रमाणे...

  1. 1951-1952

ड स्वतंत्र भारताच्या इतिहासातील लोकसभेची ही होती प्रथमच निवडणूक

ड सर्वाधिक 161 दिवस चालले मतदान, एकंदर होते मतदानाचे 75 टप्पे

ड एका टप्प्यात केवळ 5 ते 6 मतदारसंघ, मानवबळ कमतरतेमुळे निर्णय

ड एकंदर देशभरात मतदारसंघ होते 475, त्यांपैकी 80 जोडमतदारसंघ

ड काँग्रेसचा दणदणीत विजय, विस्कळीत विरोधी पक्षांना मोठाच तडाखा

ड 1947 ते 1952 च्या सर्वपक्षीय सरकारनंतर केवळ काँग्रेसचे सरकार

पक्षीय बलाबल (एकंदर जागा 489, मतदारसंघ 401)

काँग्रेस  364 मते 44.99 टक्के

समाजवादी पक्ष 12 मते 10.59 टक्के

मार्क्सवादी 16 मते 3.12 टक्के

अपक्ष, इतर 107

  1. 1957

ड काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करणारी एकतर्फी निवडणूक

ड मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतपेटी पळविण्याचा इतिहासातील पहिला प्रकार

ड बिहारमधील बेगुसराई मतदारसंघात राचीयानी येथील मतपेटी पळविली

ड पहिल्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही जोड मतदारसंघ अधिक

ड भारताचे प्रथम निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वात निवडणूक

ड भारताची प्रथम पंचवार्षिक योजना सुरु असताना झालेली निवडणूक

पक्षीय बलाबल (एकंदर जागा 484)

काँग्रेस 371 मते 47.78 टक्के

मार्क्सवादी 27 मते 5.63 टक्के

प्रजा समाजवादी पक्ष 19 मते 10.41 टक्के

अपक्ष, इतर 67

  1. 1962

ड काँग्रेसने साधली एकतर्फी विजयाची हॅटट्रिक, पुन्हा अतिप्रचंड विजय

ड चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या भांडवलशाही समर्थक पक्षाला मोठे यश

ड भारतीय जनसंघालाही प्रथमच दुहेरी अंकी 14 जागा मिळून यश

ड जोड मतदारसंघांना फाटा. त्यामुळे एका मतदारसंघात एकच खासदार

ड पहिल्या पंचवाषिर्क योजनेत फारसे यश न मिळाल्याने सरकारवर टीका

ड काँग्रेसमध्ये प्रथमच मतभेद. मुद्दा अत्यंत धिम्या आर्थिक विकासाचा

पक्षीय बलाबल (एकंदर जागा 494)

काँग्रेस   361 मते 44.72 टक्के

मार्क्सवादी 29 मते 9.94 टक्के

स्वतंत्र पक्ष 18 मते 7.89 टक्के

अपक्ष, इतर 86

  1. 1967

ड नेहरु, लालबहादुर शास्त्री या दोन पंतप्रधानांच्या मृत्यूनंतरची अग्निपरीक्षा

ड इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील प्रथमच निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका

ड काँग्रेसच्या खासदारांची संख्या प्रथमच 300 पेक्षा कमी, जनतेची नाराजी

ड जनसंघाच्या खासदारांची संख्या प्रथमच डाव्यांपेक्षा अधिक झाल्याने चर्चा

ड काँग्रेसमध्ये प्रथमच पंतप्रधानपदासाठी तीव्र स्पर्धा, ज्येष्ठ नेत्यांची नाराजी

ड पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट्यो गाठण्यात अपयशामुळे जनतेतही नाराजी

पक्षीय बलाबल (एकंदर जागा 523)

काँग्रेस 283 मते 40.78 टक्के

स्वतंत्र पक्ष 44 मते 8.67 टक्के

जनसंघ 35 मते 9.31 टक्के

अपक्ष, इतर 161

  1. 1971

ड इंदिरा गांधीच्या ‘गरीबी हटाव’ घोषणेला जनसामान्यांचा भरभरुन प्रतिसाद

ड विरोधकांच्या ‘महाआघाडी’चा धुव्वा, काँग्रेसमधील फुटीचाही लाभ नाही

ड निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीची या निवडणुकीला पार्श्वभूमी

ड 1969 मध्ये काँग्रेसचे संघटना काँग्रेस आणि काँग्रेस आर असे तुकडे

ड काँग्रेसचे डाव्या पक्षांवरील अवलंबित्व या निवडणुकीने आणले संपुष्टात

ड ही भारताची प्रथमच झालेली मध्यावधी निवडणूक, वेळेपेक्षा 1 वर्ष आधी

पक्षीय बलाबल (एकंदर जागा 523)

काँग्रेस   352 मते 43.68 टक्के

मार्क्सवादी 25 मते 5.12 टक्के

जनसंघ 22 मते 7.35 टक्के

अपक्ष आणि इतर 124

Advertisement
Tags :

.