For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई विमानतळ जलमय

06:22 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई विमानतळ जलमय
Chennai, Dec 04 (ANI): The Madras Unit of the Indian Army rescues people from the waterlogged areas of the Mugalivakkam and Manapakkam areas following heavy rainfall, in Chennai on Monday. (ANI Photo)
Advertisement

चक्रीवादळाच्या प्रभावाने मुसळधार पाऊस

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई, बेंगळूर

मिचौंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडूमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्यामुळे सोमवारी चेन्नईतील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच चेन्नईहून केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 33 उड्डाणे वळवण्यात आली होती. इंडिगो, स्पाइसजेट, इतिहाद, लुफ्थान्सा आणि गल्फ एअरच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उ•ाणे चेन्नईहून बेंगळूरकडे वळवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

प्रतिकूल हवामानामुळे सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत चेन्नई विमानतळावरील उड्डाण वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. सततच्या पावसामुळे विमानतळावर येणारी आणि जाणारी सुमारे 70 उड्डाणे रद्द करण्यात आली. ‘अनेक उड्डाणे चेन्नईहून बेंगळूरमधील केआयएकडे वळवण्यात आली आहेत’, अशी माहिती  बीआयएएलच्या अधिकाऱ्याने दिली. चेन्नई विमानतळानेही विशिष्ट कालावधीसाठी वाहतूक बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. केवळ चेन्नईच नाही तर तिऊपती, विशाखापट्टणमसह विविध भागात हवामान प्रतिकूल आहे. त्यामुळे अनेक उड्डाणे उशिराने तर अनेक रद्द करण्यात आली आहेत.

मिचौंगच्या प्रभावामुळे चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हे वादळ उद्या म्हणजेच मंगळवारी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्मयता आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भाग आणि रहिवासी भागात पाणी साचले आहे. मुख्य रस्त्यांवरही तीन ते चार फूट पाणी साचले होते. शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात वीज गेली असून इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.

Advertisement

.