For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिक्त आरक्षित पदांची माहिती घेणार

06:39 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिक्त आरक्षित पदांची माहिती घेणार
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारच्या सर्व विभागांना एक महत्वपूर्ण आदेश देण्यात आला आहे. या आदेशानुसार प्रत्येक विभागाने त्या असलेल्या रिक्त आरक्षित पदांच्या संख्येसंबंधी माहिती सरकारला पाठवायची आहे. ही माहिती कार्मिकी राज्य मंत्री जीतेंद्र सिंग यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय समाज घटकांसाठी असलेल्या पदांपैकी किती पदे रिक्त आहेत आणि किती रिक्त पदांचा बॅकलॉक उरलेला आहे, याची माहिती देण्याची सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आली आहे. रिक्त पदे आणि त्यांचा बॅकलॉक भरुन काढण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु असते. तरीही काही पदे भरावयाची शिल्लक असल्यास त्यांची माहिती मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.

Advertisement

अनेक पदांवर भर्ती

केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये आयएएस, आयपीएस आणि आयएफएस श्रेणीतील 1 हजार 195 रिक्त आरक्षित पदे भरलेली आहेत. 2018, 2019 आणि 2020 या तीन वर्षांमध्ये बव्हंशी रिक्त पदे भरण्यात आली आहेत. ही पदे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या माध्यमातून भरली जातात. गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारने विशेष अभियानाअंतर्गत पदे भरली होती, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक आरक्षित पदे रिकामी असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.

Advertisement
Tags :

.