For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेरेव्ह, गॉफ, ओसाका, किनवेन चौथ्या फेरीत दाखल

07:47 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हेरेव्ह  गॉफ  ओसाका  किनवेन चौथ्या फेरीत दाखल
Advertisement

मॅडिसन कीज, एलीस मर्टेन्स, टेलर फ्रिट्झ, अॅनिसिमोव्हा, अॅलेक्स इला यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

2026 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, चीनची किनवेन, अमेरिकेची कोको गॉफ तसेच जपानची नाओमी ओसाका यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला मॅडिसन किज, एलीस मर्टेन्स, टेलर फ्रित्झ, अमंदा अॅनिसिमोव्हा यांचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. तसेच पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांब्री आणि अनिरुद्ध चंद्रशेखर यांचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या टॉप सिडेड अॅलेक्झांडर व्हेरेव्हने 25 व्या मानांकित अॅलेजांड्रो टॅबीलोचा 6-2, 7-6 (7-2), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांमधील लढतीत व्हेरेव्हला प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविण्यासाठी पाच सेट्समधील लढतीत झगडावे लागले होते. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात 24 व्या मानांकित फ्रान्सिस्को सेरुन्डोलोने अमेरिकेच्या नवव्या मानांकित टेलर फ्रित्झचा 3-6, 4-6, 6-3, 6-4, 6-4 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या कोबोलिला तिसऱ्या फेरीतील सामन्यात 28 व्या मानांकित अॅलेक्झांडर ब्लॉककडून पराभव पत्करावा लागला.

ओसाका, किनवेन विजयी

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात चीनची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती झेंग किनवेनने अमेरिकेच्या मॅडिसन किजचे आव्हान 1-6, 7-6 (7-3), 7-5 असे संपुष्टात आणत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. या लढतीमध्ये झेंगने शेवटच्या सेटमधील अंतिम सलग 7 गेम्स जिंकले. दुसऱ्या एका सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने एलीस मर्टेन्सचा 6-3, 3-6, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ओसाकाने यापूर्वी दोन वेळेला या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. 24 व्या मानांकित अॅनास्तेसिया पोटापोव्हाने अमेरिकेच्या अमंदा अॅनिसिमोव्हाचा 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत अमेरिकेच्या फ्रित्झ तसेच मॅडिसन किज आणि अॅनिसिमोव्हा या तीन महत्त्वाच्या खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. पोटापोव्हाचा चौथ्या फेरीतील सामना रशियाच्या मायरा अँड्रीव्हाबरोबर होणार आहे.

इलाच्या घोडदौडीला ब्रेक

महिलांच्या विभागातील तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने ख्रिस्टिना बुस्काचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 2023 साली या स्पर्धेत गॉफने विजेतेपद पटकाविले होते. गॉफचा चौथ्या फेरीतील सामना अमेरिकेच्या 18 वर्षीय ईव्हा जोव्हीकशी होणार आहे. जोव्हीकने तिसऱ्या फेरीतील सामन्यात फिलिपिन्सच्या अॅलेक्स इलाची विजयी घोडदौड 7-5, 3-6, 7-5 अशा सेट्समध्ये जवळपास 3 तासांच्या लढतीत फडशा पाडत रोखली.

युकी भांब्री, अनिरुद्ध चंद्रशेखर पराभूत

पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांब्री व अनिरुद्ध चंद्रशेखर यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. न्यूझीलंड-ब्रिटनच्या आर्थर फेरी आणि जोशुआ पॅरिस या जोडीने अनिरुद्ध चंद्रशेखर व त्याचा बेलारुसचा साथिदार लियुटेरव्हिच यांचा 6-4, 5-7, 6-4 असा पराभव केला. तसेच अमेरिकेच्या रेयान सिगरमन आणि पॅट्रिक टेरहॅक या जोडीने युकी भांब्री व त्याचा न्यूझीलंडचा साथिदार मायकेल व्हीनस यांचा 7-6 (7-4), 7-6 (7-3) असा पराभव केला. हा सामना जवळपास 2 तास चालला होता. आता या स्पर्धेत एन. श्रीराम बालाजी हा  एकमेव भारतीय बाकी राहिला आहे.

Advertisement
Tags :

.