व्हेरेव्ह, कोबोली, एला, मॅडिसन कीज, एलीस मर्टन्स, पाओलिनी चौथ्या फेरीत
स्वायटेक, रायबाकिना, सॅकेरी स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था, लंडन
2026 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडची इगा स्वायटेक तसेच इलिना रायबाकिना व इटलीची मारिया सॅकेरी यांचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. अमेरिकेच्या मॅडीसन किज, 21 वर्षीय अॅलेक्सांड्रा इला तसेच इलेकी मर्टन्स यांनी शानदार विजय नोंदवित चौथी फेरी गाठली. पुरुषांच्या विभागात जर्मनीचा व्हेरेव्ह, अमेरिकेचा टेलर फ्रित्ज तसेच कोबोली यांनी तिसऱ्या फेरीतील आपले सामने जिंकले. या स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना आणि व्हिनस विलियम्स भगिनींनी दुखापतीमुळे दुहेरीतून माघार घेतली आहे.
पुरुषांच्या विभागातील तिसऱ्या फेरीत खेळविण्यात आलेल्या सामन्यात फ्रेंच ग्रँडस्लॅम विजेत्या जर्मनीच्या व्हेरेव्हने अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनचा 6-2, 7-6 (7-4), 6-4 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. व्हेरेव्हचा चौथ्या फेरीतील सामना लिहेकाशी होणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात नवव्या मानांकित कोबोलीने कॅचेनोव्हचा 0-6, 7-6 (7-4), 6-7 (5-7), 6-2, 6-2 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले.
तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या आर्थर फेरीने बेल्जियमच्या बर्जसचा 2-6, 7-5, 2-6, 7-6 (7-3), 7-6 (7-5) असा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत चौथी फेरी गाठली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत फेरी हा इंग्लंडचा एकमेव टेनिसपटू चौथ्या फेरीपर्यंत पोहोचला आहे. हा सामना 4 तास 39 मिनिटे चालला होता. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या सहाव्या मानांकित टेलर फ्रित्जने सोनेगोचा 4-6, 6-3, 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. फ्रित्जचा चौथ्या फेरीतील सामना बुबलिकशी होणार आहे. बुबलिकने तिसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सेस्का टायफोचा पराभव केला होता.

स्वायटेक धक्का
महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक तसेच इलिना रायबाकिना यांचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले आहे. 21 वर्षीय अॅलेक्सांड्रा इलाने या स्पर्धेतील विद्यमान विजेती इगा स्वायटेकला 7-6 (9-7), 6-2 अशा सेट्समध्ये अनपेक्षित पराभवाचा धक्का देत चौथी फेरी गाठली. या स्पर्धेत चौथी फेरी गाठणारी फिलीपिनोची इला ही पहिली टेनिसपटू आहे. एक वर्षापूर्वी स्वायटेकने पहिल्यांदा विम्बल्डन ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविताना अॅनिसिमोव्हाचा अंतिम सामन्यात 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला होता. आता इलाचा चौथ्या फेरीतील सामना जस्मिन पाओलिनीशी होणार आहे. पाओलिनीने तिसऱ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या मारिया सॅकेरीवर 6-1, 6-2 अशी मात केली.
अन्य एका सामन्यात एलिस मर्टन्सने 2022 ची विम्बल्डन विजेती इलिना रायबाकिनाचा 7-6 (7-4), 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. आता या स्पर्धेत बेलारुसची साबालेंका आणि जपानची नाओमी ओसाका यांच्यात चौथ्या फेरीतील सामना होईल. अमेरिकेच्या मॅडीसन किजने आपल्याच देशाच्या अॅनिसिमोव्हाचा 3-6, 6-2, 6-3 असा पराभव केला. आता मॅडीसन किजचा चौथ्या फेरीतील सामना लिंडा नोस्कोव्हाशी होणार आहे. अमेरिकेच्या अॅस्लिन व्रुगेरने युव्रेनच्या स्निगुरचा 6-3, 6-2 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले.