महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झुकेरबर्ग यांनी विकले मेटाचे 6,82,000 समभाग

06:26 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समभागांचे मूल्य 1,584 कोटी रुपयांच्या घरात : चालू वर्षात समभागात 172 टक्क्यांची वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मेटा (फेसबुक) चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मेटा प्लॅटफॉर्म इंकचे समभाग विकले आहेत. दोन वर्षांत प्रथमच. नियामक फाइलिंगद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, झुकेरबर्गच्या ट्रस्ट आणि त्यांच्याशी संबंधित इतर संस्थांनी नोव्हेंबरमध्ये 6,82,000 समभाग विकले असून यांचे मूल्य अंदाजे 185 दशलक्ष डॉलर (सुमारे 1,584 कोटी रुपये) आहे. 2022 मध्ये मेटा समभागाच्या खराब स्थितीनंतर, त्यात चांगली वाढ झाली आहे.

या वर्षी आतापर्यंत मेटाचे समभाग हे 172 टक्क्यांनी वधारले आहेत. नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच झुकेरबर्गच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी मेटा  समभाग  विकले आहेत. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत, मेटाच्या समभागांमध्ये 172 टक्के वाढ झाली आहे.

2022 मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली झुकेरबर्गने गेल्या दशकभरात नियमितपणे मेटा शेअर्सची विक्री केली होती, परंतु 2022 मध्ये त्याने कंपनीचा एकही शेअर विकला नाही. 2022 मध्ये खराब तिमाही निकालांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. मात्र त्यानंतर यंदा त्यात वाढ झाली आहे.

मेटाचे समभाग विक्रमी पातळीजवळ

39 वर्षीय झुकेरबर्गकडे अजूनही मेटाचे 13 टक्के समभाग आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य अंदाजे 117.7 अब्ज डॉलर (97.56 हजार कोटी रुपये) आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार झुकेरबर्ग जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 16 व्या क्रमांकावर आहे.

हार्वर्डमध्ये 2004 मध्ये फेसबुकची निर्मिती करण्यात आली. झुकेरबर्ग 2004 मध्ये हार्वर्डमधील त्यांच्या डॉर्म रूममध्ये फेसबुकची स्थापना केली. साइट तयार करण्याची मूळ कल्पना सोशल नेटवर्क तयार करण्याची होती जेणेकरून हार्वर्डचे विद्यार्थी एकमेकांशी ऑनलाईन कनेक्ट होऊ शकतील. तथापि, साइटने त्वरीत लोकप्रियता मिळविली आणि इतर विद्यापीठांमध्ये विस्तारली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article