For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झुकरबर्गने केली किल्ल्याची खरेदी

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
झुकरबर्गने केली किल्ल्याची खरेदी
Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी

Advertisement

विश्वविख्यात उद्योगपती मार्क झुकरबर्ग यांनी एका किल्ल्याची खरेदी केली आहे. हा किल्ला त्यांनी त्यांचे नवे निवासस्थान म्हणून विकत घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. हा किल्ला आयर्लंडमध्ये असून याचे नाव स्टँकॅली कॅसल असे आहे. हा ऐतिहासिक महत्वाचा किल्ला मानला जातो. ही खरेदी त्यांनी 3 कोटी डॉलर्स, अर्थात साधारणत: 350 कोटी रुपयांना केली, असेही स्पष्ट करण्यात आले. हा किल्ला ईशान्य आयर्लंडमध्ये असून ही एकंदर स्थावर मालमत्ता 440 एकर इतकी विस्तृत आहे. ही खरेदी ऑफ मार्केट पद्धतीने अनेक आठवड्यांपूर्वीच करण्यात आली आहे, अशी माहिती आयर्लंडच्या प्रशासनाने शुक्रवारी दिली आहे.

मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिस्किला चॅन या दोघांनी मिळून ही खरेदी केली आहे. खरेदी व्यवहार पूर्ण झालेला असला, तरी अद्याप आयर्लंडच्या मालमत्ता नोंदणी संग्रहात या खरेदीची नोंद करण्यात आलेली नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावे या किल्ल्याची नोंद केली जाणार आहे. या व्यवहाराची नेमकी किंमत अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. तथापि, ती 3 कोटी डॉलर्स असल्याचे झुकरबर्ग यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मार्क झुकरबर्ग यांची जगभरात अशा प्रकारची अनेक निवासस्थाने आहेत.

Advertisement

कसा आहे किल्ला

स्ट्रँकॅली कॅसल हा गड 19 व्या शतकात निर्माण झालेला असून त्याची रचना गोथीक पद्धतीची आहे. एकेकाळी ही पद्धती युरोपमध्ये अत्यंत लोकप्रिय होती. युरोपातील अनेक गड या रचना पद्धतीने निर्माण करण्यात आले आहेत. हा गड आयर्लंडच्या ‘ब्लॅकवॉटर खोऱ्या’त असून तो ब्लॅकवॉटर नामक नदीच्या तटावर आहे. त्याची निर्मिती पेन बंधूंनी केली असून गटाच्या आतील क्षेत्रफळ साधारणत: 16 हजार चौरस फूट इतके आहे. गडाभोवतीची सपाट भूमी 440 एकर आहे.

Advertisement
Tags :

.