For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जि.प सदस्य संदीप गावडे यांचा केसरी येथे वाढदिवस साजरा

जि प सदस्य संदीप गावडे यांचा केसरी येथे वाढदिवस साजरा
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस त्यांचे राजकीय गुरु असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम मध्ये बुधवारी सायंकाळी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त संदीप गावडे यांच्यावर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील या चाहत्यांच्या आपुलकी व प्रेमाने संदीप गावडे अक्षरशः भारावून गेले.
यावेळी सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, गेळे सरपंच सागर ढोकरे, भाजपा आंबोली मंडळ युवामोर्चा अध्यक्ष विनेश तावडे, सावंतवाडी शहर युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विनोद राऊळ यांनी संदीप गावडे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आणि जनतेच्या मनातील नेतृत्व असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या कार्य कर्तुत्वाचा प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे असल्याचे सांगितले. मायकल डिसोजा यांनी सुरुवातीला डोंबिवलीमध्ये त्यानंतर आपल्या फणसवडे सारख्या दुर्गम गावातून संदीप गावडे यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात करून पंचायत समिती सदस्य पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक राजकीय आव्हानांचा समर्थपणे सामना करीत ते जायंट किलर ठरले केला. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून तब्बल अडीच हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केल्याचे सांगत संदीप गावडे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गौरव मुळीक यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय जाण आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या बळावर संदीप गावडे यांनी तळवडेसह आंबोली परिसरात विविध विकासकामांना गती देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केल्याचे सांगून या युवा नेतृत्वाचा आदर्श इतर राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावा.
यावेळी संदीप गावडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा बळकट करण्यासह या भागासह प्रत्येक घटकाचा विकास आणि युवा वर्गाला न्याय मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. या भागाच्या मूलभूत सोयी सुविधांसह विकास कामांसाठीही आपण सातत्याने प्रयत्न करणार असून वाढदिवसानिमित्त हा जनतेने दिलेले हे प्रेम मला अधिक ताकदीने काम करण्याची ऊर्जा देणार असल्याचे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.