For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ZP Election : झेडपीची निवडणूक पुढे ढकलली ; अजित पवार यांच्या निधनामुळे निर्णय

01:38 PM Jan 30, 2026 IST | NEETA POTDAR
zp election   झेडपीची निवडणूक पुढे ढकलली   अजित पवार यांच्या निधनामुळे निर्णय
Advertisement

                               ७ फेब्रुवारी मतदान आणि ९ मतमोजणी होणार

Advertisement

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तारखात बदल करण्यात आला आहे, नवीन बदलाप्रमाणे ७ फेब्रुवारी मतदान आणि ९ फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवीन तारखांची घोषणा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर, १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्यातारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, मतदान ७ फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

Advertisement

नियोजित तारखाप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारी मतदान तर ७ फेब्रुवारी मतमोजणी होणार होती. या निवडणुकीची प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत संपल्यावर जिल्हा परिषदेसाठी २४१ आणि पंचायत समितीसाठी ४५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीचे रण तापले असताना २८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे. २९ जानेवारी रोजी पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करुन जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखांत बदल करण्यात
आला आहे. त्याप्रमाणे संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिध्द करतील.

५ फेब्रुवारी रोजी होणार प्रचाराची सांगता

जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता होऊन ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिध्द केली जातील.

Advertisement
Tags :

.