झोया काझीची अष्टपैलू कामगिरी
11:05 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेंगळूर येथे सुरू असलेल्या सदर्न प्रिन्सेस साखळी टी-20 क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या झोया काझीने सलग तीन सामन्यांत अष्टपैलू कामगिरी करत यश संपादन केले आहे. पहिल्या सामन्यात झोया काझीने 22 यार्ड्स संघाविरुद्ध खेळताना 38 धावा व 1 गडी बाद करीत सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात मोहीत किंग तामिळनाडू संघाविरुद्ध खेळताना नाबाद 50 धावा तर तिसऱ्या सामन्यात नाईस संघाबरोबर खेळताना 44 चेंडूंत 64 धावा केल्या. या स्पर्धेत झोयाने उत्तम कामगिरी केली आहे.
Advertisement
Advertisement