For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अस्वल होण्याची प्राणिसंग्रहालयाकडून ऑफर

06:55 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अस्वल होण्याची प्राणिसंग्रहालयाकडून ऑफर
Advertisement

वर्षाला मिळणार 14 लाख रुपये

Advertisement

मध्य चीनच्या एका प्राणिसंग्रहालयाने लोकांसाठी काळ्या रंगाचे अस्वल होत प्राणिसंग्रहालयात दिवसभर हिंडणे आणि त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी नोकरीची जाहिरात काढली अहे. याकरता 1 लाख युआन म्हणजेच 15 हजार डॉलर्सचे वार्षिक वेतन देण्यात येणार आहे. म्हणजेच केवळ अस्वलाचे रुप धारण करत त्याची नक्कल करण्याचे काम आहे आणि 14 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे.

हेनान प्रांताच्या लुओहे शहरातील लुओहे वन्यजीव प्राणिसंग्रहालयाने ही नोकरीची जाहिरात प्रकाशित केली आहे. यात काळ्या रंगाच्या अस्वलाची वेशभूषा करणे, प्राणिसंग्रहालयात फिरणे आणि लोकांसोबत अस्वलांप्रमाणे इशाऱ्यांमध्ये संभाषण करण्यासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याचे म्हटले गेले आहे.

Advertisement

जाहिरातीत या नोकरीसाठी एक अट ठेवण्यात आली आहे. यानुसार संबंधित व्यक्तीला दिवसभर गप्प रहावे लागेल. मानवी आवाजात तो एकही शब्दही उच्चारू शकणार नाही. ही नोकरी करणाऱ्या इसमाला केवळ अस्वलाची नक्कल करावी लागणार आहे. जाहिरातीत अस्वलाप्रमाणे स्वच्छंद कृत्यं करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. ज्या इसमाची कृत्यं जितकी विचित्र असतील, तितकेच त्याला लोकप्रिय मानले जाणार आहे.

या नोकरीची जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जाहिरातीत अनेक जण या जॉबसाठी आणखी मजेशीर अटी अन् सूचना जोडू इच्छित आहेत. यानुसार पोशाखात पंखे किंवा व्हेंटिलेशन सिस्टीम लावलेली आहे की नाही हे स्पष्ट नाही. कारण जाहिरातीत त्यांना केवळ ‘सॉफ्ट’ संबोधिण्यात आले आहे. अर्जदार म्हणून महिला अन् पुरुषांनाही सामील होता येणार आहे. परंतु त्यांना शारीरिक स्वरुपात तंदुरुस्त आणि कमीतकमी 18 वर्षे असावे लागणार आहे.

6 तासांची शिफ्ट

या पदासाठी 6 तासांची शिफ्ट सामील असून यात दर महिन्याला 4 दिवसांची रजा मिळणार आहे. अस्वलाचे रुप धारण करणाऱ्या लोकांना प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या लोकांसोबत संभाषण करताना बोलण्याची अनुमती नसते. परंतु ते अस्वलासारखा आवाज काढू शकतात, केवळ मदतीची आवश्यकता असल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत ते बोलू शकतात. भोजनाबद्दल सहज असण्याची अपेक्षा उमेदवारांकडून केली जातेय. कारण लोक खाण्यासाठी त्यांना काहीही ऑफर करू शकतात. याचमुळे त्यांना प्रत्येकाकडून अन्न स्वीकारावे लागणार आहे.

ही आमच्या क्षेत्रात सर्वात आरामदायक स्थिती आहे, जर तुम्ही थकलेले असाल तर केवळ पडून राहू शकता. जर तुम्ही उत्साही असाल तर उड्या मारू शकता, नाचू शकता, झाडावर चढू  शकता किंवा मासेही पकडू शकता, जे सोपे वाटेल ते करा असे जाहिरातीत म्हटले गेले आहे.

ही नोकरी इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी उपयुक्त मानण्यात आली आहे. कारण अस्वलाचे प्रदर्शन करणाऱ्यांना प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या लोकांशी तोंडी संवाद साधण्याची आवश्यकता नसेल. तुम्ही सर्वात विचित्र वर्तन करू शकता, वर्तन जितके अजब असेल तितकेच लोकप्रिय होईल यावर जाहिरातीत जोर देण्यात आला आहे.

काहीच दिवसांमध्येच सर्व पदे भरली गेली आहेत, परंतु एकूण किती नियुक्त्या झाल्या हे सांगण्यास प्राणिसंग्रहालयाने नकार दिला आहे. कारण 100 हून अधिक जणांनी अर्ज केला होता. सोशल मीडियावर व्हायरल होणारे लोक दरवर्षी 1 लाख युआनच्या मूळ वेतनापेक्षा अधिक कमाई करू शकतात असे प्राणिसंग्रहालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे.

ही युवांसाठी रोजगाराची एक अनोखी संधी ठरू शकते आणि आमच्या प्राणिसंग्रहालयाला महसुलाचे नवे स्रोत शोधण्यास मदत करू शकते असे प्राणिसंग्रहालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. स्थानिक सरकारच्या सहाय्याने संचालित होणारे हे प्राणिसंग्रहालय मे महिन्यात सुरु झाले होते. परंतु या जाहिरात आणि या जॉबवरून सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळे तर्क दिले आहेत, हे काम सोपे नाही असे काही युजर्सनी म्हटले आहे. हेनान प्रांतात भीषण उष्णता असू शकते, अशास्थितीत तो पोशाख परिधान करून राहणे अवघड असल्याचे युजर्सनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.