बुलेट ट्रेनमध्ये जॉम्बी थीम पार्टी
हैलोवीन फेस्टिव्हलपूर्वी जपानमध्ये प्रवाशांचे मनोरंजन
जपानमध्ये टोकियोहून ओसाका येथे जाणाऱ्या बुलेट ट्रेनमध्ये जॉम्बी थीमवर एक पार्टी आयोजित करण्यात आली. रेल्वेतून प्रवास करणारे लोक अचानक स्वत:च्या आजूबाजूला जॉम्बी पाहून रोमांचित झाले. या अॅडव्हेंचरस ट्रिपमध्ये 40 जण सामील झाले. हा इव्हेंट हॅलोवीन डेपूर्वी झाला आहे.
बुलेट ट्रेनमध्ये अशाप्रकारचा हा पहिलाच हॉन्टेंड इव्हेंट होता. प्रवासी अडीच तासांच्या प्रवासादरम्यान या हॉन्टेड हाउसमध्ये राहिले. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी हैलोवीन डे साजरा केला जातो. यादरम्यान लोक भीतीदायक पोशाख परिधान करत असतात. याचबरोबर सजावट देखील हॉन्टेड थीमवर केली जाते. यामुळे वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर होते असे लोकांचे मानणे आहे.
हा इव्हेंट ‘ट्रेन टू बुसान’ या चित्रपटावरून प्रेरित होता. याचे आयोजन कोवागरसेताई संघटनेने करविले आहे. कोवागरसेताईचा अर्थ भीती निर्माण करणारे असा होतो. हा ग्रूप अनेकदा हॉन्टेड इव्हेंट्स आयोजित करत असतो. हा इव्हेंट 2016 मधील कोरियन चित्रपट ट्रेन टू बुसानवरून प्रेरित होता. या चित्रपटात एक व्यक्ती स्वत:च्या मुलीसोबत जॉम्बीजने भरलेल्या रेल्वेत अडकून पडत असल्याचे दाखविण्यात आले होते अशी माहिती इव्हेंट ऑर्गनायजर केंता इवाना यांनी दिली आहे.
बुलेट ट्रेनमध्ये कुस्तीचा सामना
यापूर्वी या बुलेट ट्रेनमध्sय कुस्तीच्या सामन्यासह अनेक इव्हेंट्स आयोजित झाले आहेत. या रेल्वेत प्रवासी खासगी पार्ट्यांसाठी डबेही आरक्षित करू शकतात. जपानमध्ये कोरोना महामारीनंतर दीर्घ पल्ल्याच्या रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या संख्येत घट झाली होती. यानंतर रेल्वेने उत्पन्न वाढविण्यासाठी डब्यांना स्पेशल इव्हेंट्ससाठी भाडेतत्वावर देण्यास सुरुवात केली होती.
कोवागरासेताई ग्रूपने जॉम्बी थीम प्रवासासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. प्रथम हा प्रकार अशक्य असल्याचे आम्हाला वाटले. अशा इव्हेंटच्या यशस्वी आयोजनानंतर संगीत आणि कॉमेडी शो देखील रेल्वेत करविले जाऊ शकतात असे वाटत असल्याचे उद्गार जपान रेल्वेच्या पर्यटन विभागाचे पदाधिकारी मॅरी इजुमी यांनी काढले आहेत.