महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झॉम्बी फंगस रोखू शकतो कॅन्सर

07:00 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅटरपिलरला लकवाग्रस्त करणारा आणि त्याला मारणारा एक झॉम्बी फंगस माणसांसाठी उपयुक्त ठरू शकतो. एका नव्या अध्ययनानुसार याचा वापर अनेक प्रकारचे कॅन्सर रोखण्यासाठी आणि बरा करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्रत्यक्षात या झॉम्बी फंगसचे नाव कॉर्डीसेप्स आहे. कॉर्डीसेप्स कॅटरपिलरला संक्रमित केल्यावर त्याला प्रथम पॅरालाइज करतो, नंतर त्याला मारून टाकतो. मरण्यापूर्वी त्याच्या शरीरातून सर्व आवश्यक पोषक घटक शोषून घेत असतो. यादरम्यान कीड्यांच्या वर्तनाता बदल घडतो. अखेरच हा कीडा किंवा कॅटरपिलर मारला जातो. यादरम्यान एक रसायन बाहेर निघते, ज्याला कॉर्डीसेपिन म्हटले जाते.

Advertisement

खास प्रकारच्या रसायनाचा स्राव

Advertisement

वैज्ञानिकांनी कॉर्डीसेपिनचे अध्ययन केले, त्याचे जीन एक्स्प्रेसशन, सेल सिग्नलिंग आणि प्रोटीन प्रॉडक्शनची पडताळणी केली असता अखेर हे रसायन काय काय करू शकते हे समजू शकले आहे. आम्ही हजारो जीन्सच्या अध्ययनानंतर हे रसायन काय करते हे शोधून काढले आहे. याच्या माध्यमातून कॉर्डीसेपिन ट्रायफॉस्पेट नावाचा अॅक्टिव्ह कंपाउंड तयार केला असल्याची माहिती आरएनए बायोलॉजिस्ट कॉर्नेलिया डे मूर यांनी दिली आहे.

तंदुरुस्त पेशींना कॅन्सरपासून वाचवितो

हा अॅक्टिव्ह कंपाउंड पेशींच्या हालचालींना वाढवितो, त्यांना अधिक शक्तिशाली आणि सक्रीय करतो. हे रसायन पेशींना इतकी शक्ती देते की, ते कर्करोगग्रस्त पेशींमधून येणारे सिग्नल रोखते. यामुळे कॅन्सर एका पेशीतून दुसऱ्या पेशीत फैलावत नाही, म्हणजेच कॅन्सरच्या पेशींची वाढ होत नाही.

भविष्यात औषधाची निर्मिती

या झॉम्बी फंगसमधून बाहेर पडणारे रसायन अनेक प्रकारचे कॅन्सर रोखण्यास उपयुक्त ठरणार हे स्पष्ट झाले आहे. परंतु हे रसायन कशाप्रकारे काम करते हे शोधून काढले जाणे बाकी आहे. परंतु या रसायनाद्वारे कॅन्सरवरील नवी औषधे निर्माण केली जाऊ शकतात. यामुळे तंदुरुस्त पेशींना  कमी नुकसान पोहोचवून पॅन्सर पेशींना वाढण्यापासून रोखले जाऊ शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article