झोमॅटोचा नफा 346 टक्क्यांनी वधारला
वाढीसह नफा कमाई 174 कोटीं रुपयांवर : तिमाहीमधील आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/मुंबई
फूड डिलिव्हरी कंपनी इटर्नल म्हणजेच झोमॅटोने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत 17,634 कोटी रुपयांचा एकूण महसूल नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 184 टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 6,201 कोटी रुपये कमावले होते. एकूण महसुलातून पगार, कर, कच्च्या मालाची किंमत यांसारखे खर्च वजा केल्यावर कंपनीकडे 174 कोटी रुपयेरुपी निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. 2025 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत हे 346 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी कंपनीला 39 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
महसूल 196 टक्क्यांनी वाढून 17,292 कोटींवर
चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 17,292 कोटी रुपये होता. ही वार्षिक 196 टक्के वाढ आहे. जानेवारी-मार्च 2025 मध्ये कंपनीने 5,833 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेला महसूल म्हणतात.
शेअर्स वर्षात 14 टक्क्यांनी वधारले
चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर बुधवारी झोमॅटोचे शेअर्स 1.09 टक्क्यांनी वाढून 258.28 रुपयांवर बंद झाले. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 22 टक्के घसरण झाली आहे. त्याचबरोबर, यावर्षी 1 जानेवारीपासून कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्के घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. झोमॅटोचे बाजार भांडवल 2.30 लाख कोटी रुपये आहे.
एकत्रित नफ्याचे सादरीकरण म्हणजे संपूर्ण समूहाचा नफा
कंपन्यांचे निकाल दोन भागांमध्ये येतात यात स्टँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड. स्टँडअलोन अहवाल केवळ एका युनिटची आर्थिक कामगिरी दर्शवतो, तर कन्सॉलिडेटेड आर्थिक अहवाल संपूर्ण कंपनीचा अहवाल देतो. येथे, झोमॅटोमध्ये ब्लिंकइटसह 21 उपकंपन्या आणि 1 ट्रस्ट आहे. या सर्वांच्या आर्थिक अहवालाला कन्सॉलिडेटेड म्हटले जाईल. त्याच वेळी, ब्लिंकइटच्या स्वतंत्र निकालाला स्टँडअलोन म्हटले जाईल.