झोमॅटोचा नफा 63 टक्क्यांनी प्रभावीत
नफा 65 कोटींवर : सप्टेंबर तिमाहीचा निकाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटर्नल ज्याला पूर्वी झोमॅटो म्हणून ओळखले जात होते. या कंपनीने गुरुवारी, 16 ऑक्टोबर रोजी 2026 आर्थिक वर्षासाठी सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, समभाग 4 टक्क्यांनी वाढला परंतु लवकरच विक्रेते सक्रिय झाले आणि वाढ 3 टक्क्यांच्या तीव्र घसरणीत बदलली. ज्यामुळे दुपारी 3:15 वाजता शेअर 340 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.
नफ्यात 63 टक्के घट
झोमॅटोने नोंदवले की सप्टेंबर तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा वर्षाच्या आधारावर 63 टक्क्यांनी घसरून 65 कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत 176 कोटी रुपयांचा होता.
महसूल 183 टक्क्यांनी वाढला
दुसऱ्या तिमाहीत, झोमॅटोचा महसूल 13590 कोटी रुपयांचा नोंदवला गेला आहे. 1 वर्षापूर्वी 4799 कोटी रुपये महसुल प्राप्त केला.
क्विक कॉमर्सची साथ
झोमॅटोने नोंदवले की त्यांच्या क्विक कॉमर्स बिझनेसचे निव्वळ ऑर्डर मूल्य वर्षाच्या आधारावर 137 टक्के आणि तिमाही आधारावर 27 टक्क्यांनी वाढले आहे, जे गेल्या 10 तिमाहींमधील सर्वाधिक आहे.